Tokyo Olympics 2021: भारताची बॉक्सर लवलीनासह पुजा रानीही उपांत्यपूर्व फेरीत, दोघींना पदक जिंकण्यासाठी एका विजयाचीच गरज

| Updated on: Jul 28, 2021 | 5:52 PM

भारताच्या महिला बॉक्सर्सनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अप्रतिम कामगिरी सुरुच ठेवली आहे. भारताची बॉक्सर लवलीना पाठोपाठ आता पुजा रानीही उपांत्य पूर्व फेरीत पोहचली आहे.

Tokyo Olympics 2021: भारताची बॉक्सर लवलीनासह पुजा रानीही उपांत्यपूर्व फेरीत, दोघींना पदक जिंकण्यासाठी एका विजयाचीच गरज
पुजा राणी
Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताच्या महिला बॉक्सर्सनी आपली विजयी कामगिरी सुरुच ठेवली आहे. आधी मेरी कोम आणि लवलीना यांनी आपआपले पहिले विजय मिळवल्यानंतर आज बॉक्सर पुजा रानीने (Pooja Rani Boxing win) देखील विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यामुळे आणखी एक सामना जिंकताच पुजा उपांत्य फेरीत पोहचेल. ज्यामुळे तिचे किमान कांस्यपदक निश्चित होईल. लवलीनानंतर यंदा उपांत्यूपूर्व फेरीत पोहोचणारी पुजा दुसरी बॉक्सर आहे.

एकीकडे पुरुष बॉक्सर काही खास कामगिरी करु शकले नसताना महिला बॉक्सर मात्र उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. भारताचे तिन्ही पुरुष बॉक्सर पहिल्याच सामन्यात बाहेर गेले आहेत. तर तिन्ही महिला बॉक्सर्सनी पहिला सामना खिशात घातला आहे. पुजाने 75 किलोग्राम वर्गात अल्जीरियाची बॉक्सर इचराक चाइब (I. chaib) हिला नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.  पुजा आणि इचराक दोघीही ऑलिम्पिक डेब्यू करत होत्या. पण सामन्यात सुरुवातीपासूनच पुजाने वर्चस्व प्रस्थापित करत सामना 5-0 ने जिंकला.

पहिल्या दोन डावांतच घेतली आघाडी

पूजाने पहिले दोन्ही डाव आक्रमक खेळ दाखवत पूर्ण केले. तिने चाइबला पलटवार करायला संधी दिलीच नाही. आपल्या राष्ट्रीय अनुभवाचा पुरेपूर वापर करत पुजीाने सामन्यातील पहिले दोन डाव खिशात घातले. ज्यानंतर याच आघाडीच्या जोरावर उर्वरीत सामन्यातही चांगले प्रदर्शन करत सामना 5-0 ने खिशात घातला.

लवलीना आणिन पूजा पदकाच्या जवळ

पूजा आणि लवलीना या दोन्ही भारतीय महिला बॉक्सर उपांत्यपूर्व फेरीत पोहचल्या आहेत. त्यामुळे आता दोघींही आपआपल्या गटात अंतिम  8 मध्ये गेल्याने त्यांना पदकासाठी केवळ एक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. कारण उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्य़ा चारही खेळाडूंना किमान कांस्य पदक दिले जाते असा नियमच बॉक्सिंगमध्ये आहे.

हे ही वाचा

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचं पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल, दुसरा सामना जिंकत बाद फेरीत दाखल

Tokyo Olympics 2021 : भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवास खडतर, सलग तिसऱ्या पराभवाचा सामना, ग्रेट ब्रिटेनने 4-1 ने नमवलं

(Indias boxer Pooja rani defeated algerias Boxer i Chaib enterd in Quarterfinal at Tokyo Olympics)