कोरोनाचा कहर वाढला; आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 डिसेंबरपर्यंत बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

| Updated on: Nov 26, 2020 | 5:50 PM

नवी दिल्लीसह देशातील इतर राज्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवांच्या उड्डाणांवर पुन्हा बंदी घातली आहे. (International flight ban extended till Dec 31, central government decision)

कोरोनाचा कहर वाढला; आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 डिसेंबरपर्यंत बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Follow us on

नवी दिल्ली: नवी दिल्लीसह देशातील इतर राज्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवांच्या उड्डाणांवर पुन्हा बंदी घातली आहे. येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही बंदी असणार असून डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए)ने त्याबाबतचे आदेश आज जारी केले आहेत. (International flight ban extended till Dec 31, central government decision)

डीजीसीएच्या या आदेशनानंतर भारतातून परदेशात जाणाऱ्या आणि परदेशातून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानसेवांचं उड्डाण होणार नाही. मात्र, डीजीसीएचा हा आदेश इंटरनॅशनल ऑल कार्गो ऑपरेशनला लागू राहणार नाही. तसेच ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत येणाऱ्या विमान सेवाही सुरू राहणार आहेत. या आदेशानुसार काही निवडक मार्गांवरील आंतरराष्ट्रीय शेड्यूल फ्लाइट्सच्या उड्डाणांनाही मंजुरी देण्यात आली आहे. कोरोना काळात ज्या सेक्टरचं सर्वाधिक नुकसान झालं. त्यात एव्हिएशनचाही समावेश आहे. दीर्घकाळ विमानसेवा बंद राहिल्याने या सेक्टरचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. त्यामुळे सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू करून 70 टक्के क्षमतेने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती.

देशात 25 मार्च रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याआधी 23 मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. ही बंदी 29 मार्चपर्यंत होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढल्याने लॉकडाऊनचा कालावधीही सहा महिन्यावर गेला. त्यामुळे विमानांच्या उड्डाणालाही बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, सध्या दिल्लीमध्ये कोरोना संसर्ग 8.49 टक्क्यांवर आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.38 टक्क्यांवर आले आहे. दिल्लीत मागील 24 तासांमध्ये 272 भाग कंटेन्मेन्ट झोन असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दिल्ली सरकारने काही ठोस निर्णय घेतले आहेत. त्यानंतर मागील पाच दिवसांपासून बुधवारी पहिल्यांदाच 100 पेक्षा कमी कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये बुधवारी एकूण 99 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पाच हजारांच्याही पुढे गेला आहे.

दिल्लीमध्ये बुधवारी 24 तासांमध्ये कोरोनाच्या 5246 नव्या केसेस समोर आल्या आहेत. त्यानंतर आता राजधानी दिल्लीमध्ये कारोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 45 हजार 787 वर गेला आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत 8720 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर बुधवारी एकूण 5361 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. दिल्लीमध्ये आतापर्यंत 4 लाख 98 हजार 780 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. (International flight ban extended till Dec 31, central government decision)

संबंधित बातम्या:

Breaking | दिल्ली-मुंबई विमान सेवा बंद होणार?

कोरोना लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार , आगामी अर्थसंकल्पात 500 अब्ज रुपयांची तरतूद?

दिल्लीत कोरोना संसर्ग 8.49 टक्क्यांवर, 5 दिवसांमध्ये पहिल्यांदाच मृतांचा आकडा 100 च्या खाली

(International flight ban extended till Dec 31, central government decision)