मुंबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमात (IPL 2020) मुंबई इंडियन्सनी (Muambai Indians) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings)अंतिम सामन्यात विजय मिळवला. यासह मुंबईने पाचव्यांदा विजेतपद पटकावलं. आयपीएलच्या या 13 व्या मोसमाला कोरोनामुळे 5 महिन्यांच्या विलंबाने सुरुवात झाली. मात्र कोरोनावर लस सापडल्यास आयपीएलचा आगामी हंगाम वेळेत सुरु होईल, अशा आशावाद बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने (Bcci President Sourav Ganguly) काही दिवसांपूर्वी व्यक्त केला. यातच बीसीसाआय आयपीएलच्या 14 व्या हंगामात नव्याने 2-3 संघांना जोडण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातंय. या निर्णयाचा आयपीएलमधील फ्रंचायजींनी विरोध केला आहे. मात्र टीम इंडियाचा ‘द वॉल’ म्हणजेच राहुल द्रविडने बीसीसीआयच्या या निर्णायचं स्वागत केलं आहे. IPL 2021 Rahul Dravid welcomes the decision of the increased team in the upcoming IPL season, said
“आयपीएल स्पर्धेमुळे आतापर्यंत अनेक युवा खेळांडूना संधी मिळाली आहे. आयपीएलमुळे युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालंय. मात्र असेही काही खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलमध्येही संधी मिळत नाही. त्यामुळे युवा खेळाडूंच्या दृष्टीने पाहता संघवाढीचा निर्णय योग्य असल्याचं द्रविड म्हणाला”. राजस्थान रॉयल्सचे सहमालक मनोज बदाले यांच्या पुस्तकाचं ऑनलाईन प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस द्रविडने हे वक्तव्य केलं. याबाबतचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. द्रविड पुढे म्हणाला की, “युवा खेळाडूंमध्ये असलेली प्रतिभा पाहता आयपीएल संघ वाढीसाठी तयार आहे. तसेच दररोज प्रतिभावान उदयनमुख खेळाडू समोर येत आहेत.”
मनोज बदालेंनीही या निर्णायचं स्वागत केलंय. “मात्र असं करताना या स्पर्धेच्या दर्ज्याला बाधा निर्माण होणार नाही, याबाबतही त्यांनी लक्ष वेधून घेतलं. तसेच संघ वाढल्यास बहुतेक सामने हे दुपारी खेळवावे लागतील”, असं बदाले म्हणाले.
बीसीसीआय (BCCI) आयपीएलमध्ये आणखी दोन नवे संघ समाविष्ट करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी BCCI दिवाळीनंतर निविदा काढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएलमध्ये नव्या संघांचा समावेश झाला तर खेळाडूंचा मोठा लिलाव होईल.
आयपीएलमध्ये आतापर्यंत प्रत्येक संघाला नियमांनुसार अंतिम 11 खेळांडूंमध्ये फक्त 4 खेळाडूंनाच खेळवता येत. मात्र हा आकडा 4 वरुन 5 करण्याची लगबगक सुरु असल्याची माहिती मिळतेय. मात्र याबाबत अजूनही कोणतीच खात्रीशीर किंवा औपचारिक माहिती मिळाली नाहीये.
आयपीएलमध्ये आता एकूण 8 फ्रँचायझी आहेत. या फ्रँचायझींचा नव्याने संघ वाढीच्या निर्णायाला विरोध आहे. नवीन संघ आल्यास संबंधित फ्रँचायझीला आपल्या ताफ्यातील खेळाडू बदलावे लागतील, अशी भिती फ्रँचायझीकडून व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे संतुलीत असलेल्या संघाचं संतुलन बिघडण्याची भितीही फ्रँचायझीला वाटतेय.
संबंधित बातम्या :
IPL 2021 | आयपीएल संपण्यापूर्वीच नव्या मोसमाचं नियोजन, 4 महिन्यांनी पुन्हा चौकार-षटकार?