नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आयसीसच्या एका अतिरेक्याला अटक केली आहे. त्याच्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे. हा शस्त्रसाठा दिल्ली पोलिसांनी जप्त केला आहे. दिल्लीतील धौला कुआं आणि करोल बागदरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली (ISIS terrorist arrested by special cell of Delhi Police).
दिल्ली पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये फायरिंग झाली. यादरम्यान एका अतिरेक्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. अतिरेक्यांना पकडण्यासाठी दिल्लीतील विविध ठिकाणी छापा टाकला जात आहे. दरम्यान, ज्या भागात पोलीस आणि अतिरेकी यांच्यात चकमक झाली त्याठिकाणी बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे (ISIS terrorist arrested by special cell of Delhi Police).
दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रमोद सिंह कुशवाहा यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “आयसीसचा एक अतिरेकी आयईडी स्फोटकासह पकडला गेला आहे. धौला कुआं येथे विशेष पथक आणि अतिरेक्यामध्ये फायरिंग झाली. पकडल्या गेलेल्या अतिरेक्याचे नाव अब्दुल युसुफ आहे. त्याच्याजवळ एक पिस्तुलदेखील मिळाली आह”, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
One ISIS operative arrested with Improvised Explosive Devices (IEDs) by our Special Cell after an exchange of fire at Dhaula Kuan: Pramod Singh Kushwaha, Delhi Deputy Commissioner of Police (DCP), Delhi Police Special Cell pic.twitter.com/nIJrR03iUA
— ANI (@ANI) August 22, 2020
प्रेशर कुकरमध्ये 15 किलो आयईडी स्फोटक
दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत सहा जागांवर छापा टाकला आहे. उत्तर प्रदेशातही काही ठिकाणी छापा टाकला जात आहे. अतिरेक्याच्या दुचाकीवर उत्तर प्रदेशची नंबरप्लेट होती. ही दुचाकी चोरीची होती की कुठून विकत घेतली होती, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत.
अतिरेकी अब्दुल युसूफ हा ‘टीव्हीएस अपा’चे या दुचाकीवर होता. त्याच्याजवळ असलेल्या प्रेशर कुकरमध्ये 15 किलो आईडी स्फोटक होतं. याशिवाय त्याच्याजवळ दोन आयईडी बॉम्बदेखील होते.
आयसीसच्या अतिरेक्यांचा दिल्लीत मोठा घातपात घडवण्याचा कट आहे. गुप्तचर विभागाकडून याबाबत दिल्ली पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्याचआधारावर दिल्ली पोलिसांकडून विविध ठिकाणी छापा टाकला जात आहे.
देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अतिरेक्यांचा सण-उत्सवाच्याच दिवशी मोठा घातपात घडवण्याचा कट असतो. मात्र, दिल्ली पोलिसांनी हा कट उधळून लावला आहे.