पुणे : महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली जलयुक्त शिवार योजना म्हणजे केवळ जेसीबी योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त जेसीबीची खरेदी झाली, असा आरोप ज्येष्ठ पत्रकार आणि कृषी अभ्यासक पी. साईनाथ यांनी केला आहे. कृषी समस्यांसाठी 15 दिवसांचं संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणीही पी. साईनाथ यांनी केली आहे.
“स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करायला हव्यात. शरद पवार कृषिमंत्री असताना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी केली होती. पण त्यांनी ऐकलं नाही. केंद्रात महत्वाचे मंत्री होते, त्यांनी ठरवलं असतं तर त्याचवेळी विशेष अधिवेशन बोलवले असते, पण त्यांनी तसं केलं नाही.”, अशी खंतही पी. साईनाथ यांनी व्यक्त केली. शिवाय, स्वामिनाथन आयोग लागू करणार असं मोदी म्हटले होते, पण ते सर्व झूठ असल्याची टीका पी. साईनाथ यंनी केली.
पाण्यावरुन ग्रामीण आणि शहरी अशी दरी पाडण्यात आली आहे. यापूढे पाण्याचं मोठं संकट उभं राहणार आहे, अशी भीतीही पी. साईनाथ यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, देशातील आर्थिक नीती बदलाची गरजही पी. साईनाथ यांनी बोलून दाखवली.
पी. साईनाथ यांच्या मुलाखतीतले महत्त्वाचे मुद्दे :
कोण आहेत पी. साईनाथ?
पी. साईनाथ हे ज्येष्ठ पत्रकार आणि आर्थिक, राजकीय, सामाजिक विषयांचे जाणकार आहेत. ग्रामीण भाग आणि कृषी विषयाचे ते अभ्यासक आहेत. पिपल्स आर्काईव्ह्ज ऑफ रुरल इंडिया (पारी) या संकेतस्थळाचे ते संस्थापक संपादक आहेत. तसेच, द हिंदू या प्रसिद्ध वृत्तपत्रात त्यांनी ग्रामीण संपादक म्हणूनही काम पाहिले. अल्बर्टा विद्यापीठाने पी. साईनाथ यांना मानद डॉक्टरेट पदवीने गौरवलं आहे. रॅमन मॅगसेसे या महत्त्वाच्या पुरस्कारानेही पी. साईनाथ यांचा गौरव झाला आहे.
पाहा संपूर्ण मुलाखत :