जळगाव : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जळगावमध्ये 7 जुलै ते 13 जुलै दरम्यान कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला (Jalgaon Lockdown Rules). त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात उद्यापासून म्हणजेच 14 जुलैपासून जळगाव शहर, भुसावळ आणि अमळनेर शहर पूर्ववत सुरु होतील. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबत घोषणा केली आहे (Jalgaon Lockdown Rules).
नागरिकांनी आठवड्यातील दोन दिवस स्वत:हून लॉकडाऊन पाळावा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत सुरु राहतील. दरम्यान, जिल्ह्यातील मार्केट आणि मॉल्स हे बंदच राहतील, असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
जळगाव शहर, भुसावळ, अमळनेर येथील मार्केट परिसर किंवा गर्दीच्या ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या भागात कोणत्याही दुचाकी, चारचाकी, रिक्षा इत्यादी वाहनांना प्रवेशबंद असेल. मात्र, अत्यावश्यक सेवेतील गाड्यांना प्रवेश असेल.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव महापालिका आयुक्तांना महापालिका क्षेत्रातील सहा विभागांचे विभाजन करुन नागरिकांना दर आठवड्याला दोन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करावे, असे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा करुन आठवड्यातील दोन दिवस ठरवावे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी असेच आदेश अमळनेर आणि भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनादेखील दिले आहेत.
जळगाव जिल्हातील सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना पूर्णवेळ चेहऱ्यावर (हातरुमाल किंवा तत्सम साधनांचा वापर न करता) मास्कचा वापर करावा. याशिवाय भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते यांना ठरवून दिलेल्या जागीच विक्री करता येईल, असं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
जळगावात काय सुरु काय बंद?