मुंबई : भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये खडसेंचं स्वागत केलं तर भाजपवरही टीका केली. भाजमध्ये खडसेंनी आपलं मोठं योगदान दिलं पण काना मागून आला आणि तिखट झाला असा टोला जयंत पाटील यांनी नाव न घेता फडणवीसांना लगावला आहे. (jayant patil criticized on devendra fadnavis)
‘पक्षामध्ये खडसेंवर अन्याय झाला. त्यांनी मुंडेच्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. एकनाथ खडसेंना त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत न्याय करेल असं वाटत होतं. मात्र, तसं झालं नाही. त्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडेंसह पक्ष वाढवला आहे.’ अशा शब्दात जयंत पाटीलांनी टीका केली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील….
एकनाथ खडसेंनी विधीमंडळाचा सदस्य काय करु शकतो हे दाखवून दिलं. त्यांची विरोधी पक्षनेते म्हणून ताकदही आम्ही पाहिली. खडसेंचा एक दिग्गज नेता मंत्री झाला, मात्र पहिल्या रांगेतील नेत्याला सभागृहातील मागच्या रांगेत बसवण्याचं काम भाजपमध्ये झालं. खडसेंवरील अन्यायावर सभागृहात सर्वात जास्त मीच बोललो. (jayant patil criticized on devendra fadnavis)
कटप्पाने बाहुबली को क्यु मारा असा प्रश्न मी विचारला, पण आजही त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. आजही ते टीव्ही पाहात असतील. आज त्यांना कळालं असेल की टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है हे आता त्यांना कळेल.
शरद पवार यांच्याकडून आम्ही महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण शिकलो. यशवंतराव चव्हाण यांनी हे राजकारण महाराष्ट्रात रुजवलं. मात्र, महाराष्ट्रात मागील 4-5 वर्षात विरोधकांना अडचणीत आणण्याचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं.
लोकसभेत राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. विधानसभा निवडणूक आली. शरद पवार यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांच्या संस्था उभ्या केल्या, कार्यकर्ते घडवले असे मोठे मोठे लोक आम्हाला सोडून गेले. मात्र, महाराष्ट्राची जनता शद पवार यांचाच विचार स्वीकारेल यावर आमचा विश्वास होता.
शरद पवार यांना ईडीची नोटीस देण्यापर्यंत मजल केली. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः ईडीच्या कार्यालयाला भेट दिली. 79 वर्षांचा हा नेता संपूर्ण महाराष्ट्रात फिरला आणि सत्ताबदल केला.
(jayant patil criticized on devendra fadnavis)