एकीकडे मुख्यमंत्री कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृतीसह नियमांची सक्ती करत आहेत तर दुसरीकडे सरकारमधील नेतेच नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत.
राज्य सरकारमधील मंत्र्यांकडूनच कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचं समोर आलं आहे. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता कशा प्रकारे नेत्यांनी भर कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा करत मास्कही काढून टाकले आहे.
उस्मानाबाद इथं पदवीधर निवडणुकीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मास्क न घालता हारतुरे स्वीकारले. यावेळी अगदी कोरोना विसरून फोटोसेशनही करण्यात आलं.
जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे आजी-माजी मंत्री, आमदार पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावासाठी हजर होते.
या मेळावात सोशल डिस्टंसिंग आणि कोरोना नियमांचे तीन तेरा झाल्याचं पाहायला मिळतं.
एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच सत्तेतील मंत्र्यांचा असा बेजबाबदारपणा पाहायला मिळत आहे.