ठाणे : कल्याण पूर्वेत भरदिवसा दुपारी तीन वाजेच्या सुमारास ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी धारधार शस्त्राने ज्वेलर्सचे मालक आणि कर्मचाऱ्याला जखमी केले. ज्वेलर्समधील कर्मचाऱ्याने जखमी अवस्थेत एका चोरट्याला पकडलं. तर दोन चोरटे 30 तोळे सोने आणि दीड लाखांची रोकड घेऊन पसार झाले (Jewellery shop looted in kalyan).
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ज्वेलर्स मालकाने पकडलेल्या चोरट्याला नागरिकांनीही चोप दिला. त्यानंतर पोलीस आल्यावर नागरिकांनी चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. लूटारुंकडे रिव्हॉल्वर असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या कोळसेवाडी पोलीस तपास करीत आहेत. सणासुदीचा फायदा घेत चोरट्यांनी हा डाव साधला.
कल्याण पूर्वेतील नांदीवली परिसरात वैष्णवी ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात आज साडेतीन वाजेच्या सुमारास तीन चोरटे आले. त्यांनी दुकानात लूटपाट सुरु केली. दुकानात असलेल्या कर्मचाऱ्याला धारधार हत्याराने जखमी केले. तीघांपैकी दोन लुटारु दुकानातील 30 तोळे दागिने आणि 1 लाख 60 हजारांची रोकड घेऊन पसार झाले.
दरम्यान, दुकानातील कर्मचारी रुपाराम चौधरी यांनी जखमी अवस्थेत एका चोरट्याला पकडून ठेवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. तीन पैकी दोन चोरटे संधीचा फायदा घेत पळून गेले. त्याचवेळी दुकानदार दुकानात आले (Jewellery shop looted in kalyan).
आजूबाजूच्या लोकांनी या चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी एफआयआर दाखल झाला असून लवकरच चोरट्यांचा शोध घेऊ, असं सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान, तपास सुरु आहे. पण, पोलीस लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावणार का? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित बातम्या :
रस्त्याने बोलत जाणाऱ्यांचे मोबाईल पळवायचे, सोलापूर पोलिसांकडून तीन आरोपींना बेड्या
मोबाईल शॉपीवर दरोडा; 16 लाखांचे मोबाईल लंपास, रिकामे बॉक्स मात्र दुकानातच
कोल्हापुरात मोबाईलचं दुकान फोडलं, साडे 16 लाखांचा मुद्देमाल लंपास