ठाणे : कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर यांच्यात झालेल्या वादानंतर आयएमए कल्याण या डॉक्टरांच्या संघटनेने एक दिवस रुग्णालये बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नगरसेवकाने संबंधित डॉक्टरची माफी मागितल्यावर डॉक्टरांनी एक दिवसाचा संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे (Kalyan Shiv Sena leader Mahesh Gaikwad apologizes to doctor).
कल्याण पश्चिमेतील वैष्णवी रुग्णालयामध्ये शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि रुग्णालयाचे डॉक्टर अश्वीन कक्कर यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादाचा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या वादानंतर आयएमए कल्याण या डॉक्टरांच्या संघटनेने एक दिवस रुग्णालये बंद ठेवण्याचा इशारा दिला. मात्र, शहरातील रुग्णालये संपूर्ण एक दिवस बंद राहिल्यास मोठा फटका बसू शकतो, या जाणीवेतून नगरसेवक महेश गायकवाड यांनी माघार घेत डॉक्टरांची माफी मागितली आहे.
नेमकं प्रकरण काय?
दोन दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेला रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेतले. रुग्णालयाच्या बाहेर महिलेच्या नातेवाईकांनी थांबू नये, अशी ताकीद देण्यात आली होती. मात्र, तरीदेखीस गर्भवती महिलेचे नातेवाईक घरी गेले नाहीत. त्यामुळे नातेवाईकासह गर्भवती महिलेससुद्धा डॉक्टर कक्कर यांनी बाहेर काढले. या प्रकरणी गायकवाड यांनी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली होती (Kalyan Shiv Sena leader Mahesh Gaikwad apologizes to doctor).
“प्रसूती रुग्णालय असल्याने एकाही पुरुषाला आत सोडले जात नाही. त्यासाठी त्यांना ताकीद दिली होती. त्यांच्यासोबत अनुचित प्रकार केला नाही”, अशी भूमिका डॉक्टर कक्कर यांनी मांडली आहे. दरम्यान, कक्कर यांच्यासोबत नगरसेवकाकडून जी वागणूक मिळाली, त्यानंतर डॉक्टरांची संघटना कल्याण आयएमएने सर्व रुग्णालय उद्या 25 नोव्हेंबर रोजी बंद करण्याचा इशारा दिला. दरम्यान, नगरसेवकाने माफी मागितल्यानंतर संघटनेने संप मागे घेतला.
कल्याण आयएमए संघटनेने एका पत्रकाद्वारे संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे. “संबंधित नगरसेवक गायकवाड यांनी कक्कर यांची भेट घेऊन माफी मागितल्याने हा संप मागे घेतला आहे. नगरसेवक गायकवाड यांनी सुद्धा हा प्रकार गैरसमजूतीतून झाला असल्याचे स्पष्ट केले आहे”, असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा :