इस्लामाबाद : पाकिस्तानच्या कराची शहरातील स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवर आज (29 जून) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला (Karachi Terror Attack). दहशतवाद्यांनी इमारतीत शिरुन अंधाधुंद गळीबार केला. याशिवाय त्यांनी ग्रेनेड हल्लादेखील केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत (Karachi Terror Attack).
विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी जेव्हा अंधाधुंद गोळीबार सुरु केला तेव्हा इमारतीत जवळपास 300 कर्मचारी होते. या हल्ल्याची माहिती मिळताच कराची पोलीस आणि पाकिस्तान रेंजर्सचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि सुरक्षा जवानांनी सुरुवातीला इमारतीत अडकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढलं. या सर्व कर्मचाऱ्यांना इमारतीच्या पाठीमागच्या गेटने बाहेर काढण्यात आलं. तर पुढचं मेन गेट सील कण्यात आलं.
हेही वाचा : शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी उलटली, एक्स्प्रेस वेवर अपघात
अतिरेक्यांनी इमारतीच्या मेन गेटवर ग्रेनेड हल्ला केला. पाकिस्तानच्या जवानांनी अतिरेक्यांना तोडीस तोड उत्तर देत इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर जवानांनी चार अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. यापैकी एका अतिरेक्याचा मेन गेटवरच खात्मा करण्यात आला. तर इतर अतिरेक्यांना स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत मारले.
“चारही अतिरेकी मारले गेले आहेत. हे सर्व अतिरेकी सिल्वर रंगाच्या गाडीतून आले होते”, अशी माहिती कराची पोलीस खात्याचे प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी दिली आहे. दरम्यान, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत गोळीबार अजूनही सुरु आहे. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केला आहे. पोलीस आजूबाजूच्या इमारतीत कसून चौकशी करत आहेत, अशी माहितीदेखील समोर आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने आपल्या निवेदनात “बलूच लिबरेशन आर्मीच्या माजिद ब्रिगेडने कराची स्टॉक एक्सचेंजवर आज आत्मत्याग केला”, असं म्हटलं आहे.
Two killed as terrorists attack Pakistan Stock Exchange in Karachi, people from the building being evacuated: Pakistan media pic.twitter.com/IUeqvtYyoz
— ANI (@ANI) June 29, 2020