कार्तिकी एकादशी : महापूजा संपन्न, कोल्हापूरचं दाम्पत्य मानाचे वारकरी

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

रवींद्र लव्हेकर, टीव्ही 9 मराठी, पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा महसूलमंत्र्याच्या हस्ते संपन्न झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मेंगाणे  दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले. जवळपास सात लाख भाविकांची कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यास उपस्थिती लावली आहे. राज्यातील दुष्काळ हटवण्याचे बळ दे आणि मराठा समाजाला दिलेल आरक्षण न्यायलयात टिकू दे, असं साकडं महसूलमंत्र्यांनी विठूरायाला घातलं. […]

कार्तिकी एकादशी : महापूजा संपन्न, कोल्हापूरचं दाम्पत्य मानाचे वारकरी
Follow us on

रवींद्र लव्हेकर, टीव्ही 9 मराठी, पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा महसूलमंत्र्याच्या हस्ते संपन्न झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मेंगाणे  दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले. जवळपास सात लाख भाविकांची कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यास उपस्थिती लावली आहे. राज्यातील दुष्काळ हटवण्याचे बळ दे आणि मराठा समाजाला दिलेल आरक्षण न्यायलयात टिकू दे, असं साकडं महसूलमंत्र्यांनी विठूरायाला घातलं.

आज कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी. आज पहाटे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्निक केली. यावेळी पदस्पर्श दर्शन रांगेतील मानाचा वारकरी होण्याची संधी कोल्हापूर जिल्हयातील कागलच्या मळगे बुद्रूक येथील बाळासाहेब मेंगाणे आणि आनंदीबाई मेंगाणे या दाम्पत्यास मिळाला आहे. पहाटे सव्वादोन वाजता विठूरायाची शासकीय महापूजा विधीवत धार्मिक वातावरणात संपन्न झाली.

आज विठूरायास लाल रंगाची, सोनेरी नक्षीची अंगी पिवळे सोवळे आणि डोक्यावर सोन्याचा मुकूट अशा सुंदर पोशाखात देवाच सावळे रुप अधिकच मनमोहक दिसत होते. विठूरायाच्या देव्हाऱ्याला रंगीत आकर्षक विविध फुलांनी सजवले होते. रुक्मिणी मातेसही पिवळया रंगाची पैठणी परिधान केली होती. रुक्मिणी मातेच्या डोक्यावरही सोन्याचा मुकूट असा सुंदर रूपातील देवीच रुप सुंदर दिसत होतं.

महापूजेनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपण विठूरायास राज्यातील दुष्काळ हटवण्याचे बळ दे, मराठा समाजास दिलेल आरक्षण न्यायलयात टिकू दे, असं साकडे घातल्याचे सांगितले.

महापूजेचा व्हिडीओ :

विठूनामाच्या गजराने, टाळ मृदूंगाच्या आवाजाने आणि अभंगाच्या स्वरानी  संपूर्ण पंढरी नगरी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. सात  लाख भाविक या सोहळ्यासाठी  महाराष्ट्रासह, कर्नाटक, तेलंगणा राज्यातून आज पंढरीनगरीत दाखल झाले आहेत.