सकारात्मक ऊर्जा आणि धनप्राप्तीसाठी घरात ठेवा पितळेचे कासव, मात्र त्या आधी जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य दिशा

| Updated on: Dec 14, 2024 | 5:14 PM

घरामधील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार घरात पितळाचे कासव ठेवणे शुभ मानले जाते. घरात पितळाचे कासव ठेवल्याने पैसे येण्याचे नवीन मार्ग तयार होतात. घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख-समृद्धी येण्यासाठी कासवाला योग्य दिशेला ठेवणे गरजेचे आहे. पितळाचे कासव कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. अन्यथा याचे विपरीत परिणाम होतात.

सकारात्मक ऊर्जा आणि धनप्राप्तीसाठी घरात ठेवा पितळेचे कासव, मात्र त्या आधी जाणून घ्या कासव ठेवण्याची योग्य दिशा
Follow us on

वास्तुशास्त्रानुसार घरात पितळाचा कासव ठेवल्याने घरात सकारात्मकता कायम राहते. घरात पितळाचे कासव ठेवल्यास आर्थिक समस्या दूर होतात आणि पैसे कमवण्याचे नवीन मार्ग तयार होतात. यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते घरांमध्ये पितळाचा कासव ठेवताना योग्य दिशा आणि नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जाणून घेऊया घरात पितळी कासव ठेवण्याचे नियम आणि त्याचे फायदे.

पितळाचा कासव ठेवण्याची योग्य दिशा कोणती?

वास्तुशास्त्रानुसार कासवाला सकारात्मक ऊर्जेसाठी योग्य दिशेने ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घरात पितळाचे कासव ठेवणे शुभ मानले जाते. हे घराला सुरक्षितता आणि समृद्धी प्रधान करते. कासवामुळे घराचे संरक्षण होते. पितळाचे किंवा चांदीचे कासव नेहमी उत्तर – पश्चिम दिशेला ठेवावे. त्यासोबतच क्रिस्टलचे कासव ईशान्य कोपऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.

पितळाचे कासव घरात ठेवण्याचे नियम?

घरात कासव ठेवताना तो नेहमी पाण्यातच ठेवावा. ज्यामुळे त्याचे पाय ओले राहतील. कासव ठेवलेले पाणी दररोज बदलावे. कासवाला तुम्ही जिथे जास्त वेळ घालवता त्या ठिकाणी ठेवा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ कासव ठेवून त्याचे तोंड घरामध्ये असेल या पद्धतीने ठेवा. शक्य झाल्यास घरातील देवघराकडे कासवाचे तोंड होईल या पद्धतीने कासव ठेवा. त्यामुळे कासवाला योग्य वातावरण मिळेल आणि पाणी बदलल्यामुळे स्वच्छता राहते तसेच आजारांना प्रतिबंध होतो.

हे सुद्धा वाचा

सकारात्मक ऊर्जेसाठी घरात ठेवा पितळाचा कासव

वास्तुशास्त्रानुसार घरात पितळाचे कासव ठेवल्याने शुभ फळ प्राप्ती होते. यामुळे घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते. त्यासोबतच नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन प्रत्येक कामात यश मिळते. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे कासवाला योग्य दिशेला ठेवणे आणि त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे तरच तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळतील. तुमच्या घराच्या उत्तर – पूर्व दिशेला कासव ठेवावे. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते. कुटुंबात शांती आणि समृद्धी येते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)