कोल्हापूर : दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल काल (29 जुलै) जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूरच्या जुळ्या भावांना समान गुण मिळाले आहेत. प्रज्वल देसाई आणि प्रणित देसाई असं या दोघी भावंडांची नावे आहेत. ते कोल्हापूरच्या फुलेवाडी परिसरात कुटुंबासह राहतात. दोघी भावांना दहावीत समान गुण मिळाल्याने अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. कोल्हापूरच्या फुलेवाडीत तर सध्या या जुळ्या भावांचीच चर्चा सुरु आहे (Kolhapur twins brothers get same marks in SSC Board Exam).
प्रज्वल आणि प्रणित या दोघी भावांना दहावीत 500 पैकी 445 गुण मिळाले आहेत. ते 89 टक्क्यांनी उत्तीर्ण झाले आहेत. जुळ्या भावांना समान गुण मिळाल्याने कुटुंबीयदेखील आश्चर्यचकीत झाले आहेत (Kolhapur twins brothers get same marks in SSC Board Exam).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
प्रज्वल आणि प्रणित ही भावंडं फुलेवाडीतील श्री गुरुदेव विद्यानिकेतन शाळेत शिक्षण घेत होते. या जुळ्या भावांना आतापर्यंत एकाही इयत्तेत समान गुण मिळाले नाही. मात्र, दहावीच्या परीक्षेत हा योग जुळून आला. विशेष म्हणजे परीक्षेत या दोघांचे नंबर वेगवेगळ्या इमारतीत आले होते. मात्र, तरीही दोघांना सेम टू सेम गुण मिळाले.
प्रज्वल हा अभ्यासात हुशार तर प्रणित खेळात पटाईत आहे. दहावीच्या परीक्षेत प्रज्वलला 500 पैकी 445 गुण मिळाले. तर प्रणितला 440 गुण मिळाले. मात्र त्याला खेळाचे पाच गुण जादाचे मिळाल्याने दोघांचेही गुण समान झाले. दोघेही 89 टक्क्यांनी उत्तीर्ण झाले. दोन्ही मूलं चांगल्या गुणांनी पास तर झालेच याशिवाय दोघांनाही एकसमान गुण पडल्यान देसाई कुटुंबात दुहेरी आनंदाचं वातावरण आहे.
दरम्यान, जुळ्या भावंडांना समान गुण मिळाल्याने नातेवाईकांमध्येही चर्चा रंगली आहे. काही नातेवाईकांकडून चेष्टेत परीक्षेत दोघांचे नंबर मागेपुढे होते का? दोघांनीही कॉपी केली का? अशी विचारणा केली जात आहे. मात्र, परीक्षा वेगवेगळ्या इमारतीत दिल्याचे सांगताच विचारणारेदेखील आश्चर्यचकित होतात.
संबंधित बातम्या :