रत्नागिरी : कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे (Konkan Corona Update). रत्नागिरी जिल्ह्यात आज (25 मे) 11 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 156 वर पोहोचला आहे. कोकणात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने धाकधूक वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 17 वर पोहोचला आहे (Konkan Corona Update).
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहेत. रत्नागिरीत गेल्या 24 तासात 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. खेड तालुक्यातील ताले या गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई सारख्या रेड झोन परिसरातून शेकडो चाकरमाणी कोकणात आपापल्या गावी गेले. मुंबईहून कोकणात गेलेल्या चाकरमाण्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
दरम्यान, रत्नागिरीत तालुक्यात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीत तालुक्यात आतापर्यंत 36 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मंडणगड आणि दापोली तालुक्यात प्रत्येकी 23 रुग्ण, संगमेश्वर आणि खेड तालुक्यात 22 रुग्ण आहेत. गुहागर तालुक्यात 14 रुग्ण, चिपळूण तालुक्यात 10 रुग्ण, राजापूर तालुक्यात 4 रुग्ण आणि लांजा तालुक्यात 2 रुग्ण आढळले आहेत.
दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 23 मे रोजी 8 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (Konkan Corona Cases) आला होता. यात कणकवली 6, वैभववाडी 1 आणि मालवण तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. तर काल (24 मे) आणखी एक नवा रुग्ण आढळला होता.
रत्नागिरीत आतापर्यंत 55 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रत्नागिरीत सध्या 97 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 17 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 12 रुग्णांवर उपचार सुरु आहे.
संबंधित बातम्या :
नागपूरकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त!