मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) यांच्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या चित्रपटाविषयी एक बातमी समोर आली असून क्रिती सेनॉनने अक्षय कुमारसोबतचे तिचे शूटिंग पूर्ण करून घेतले आहे. क्रितीने अक्षय कुमारसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे. (Kriti Sanon shared a photo with Akshay Kumar on social media)
हा फोटो शेअर करताना क्रितीने लिहिले आहे की, बच्चन पांडे चित्रपटातील माझा अक्षय कुमारसोबतचा प्रवास संपला आहे. या चित्रपटाचे शेड्यूल माझ्या आयुष्यातील कमालीचे राहिले आहे. शूटिंग करतानाची मस्ती ते खेळ आणि जेवणाचा आनंद घेताना हे शूटिंग कधी संपले ते कळालेच नाही. आम्ही एक परिवार झालो होतो. चला तर मग भेटूयात आता सरळ सिनेमा घरात..
‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अरशद वारसी, जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी हे स्टारही या चित्रपटात दिसणार आहेत.‘बच्चन पांडे’ हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. पंकज त्रिपाठी ‘सुपर 30′ आणि ’83’ नंतर आता बच्चन पांडेमध्ये तिसऱ्यांदा साजिद नाडियाडवालासोबत काम करणार आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी हे प्रथमच एकत्र स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत.
संबंधित बातम्या :
सुशांत सिंह राजपूतचा केंद्र सरकार सन्मान करणार; नॅशनल अॅवार्डला सुशांतचे नाव देण्याचा विचार सुरू!
Video : सोनू सूदने उघडला ढाबा, खवय्यांना दिलं आवतन; म्हणाला…
सैफ-करीनाच्या बाळाचं नाव काय असेल?; रणधीर कपूर म्हणतात…
(Kriti Sanon shared a photo with Akshay Kumar on social media)