नवी दिल्ली : काश्मिरी पंडितांवर आधारित ‘शिकारा’ चित्रपट शुक्रवारी (7 फेब्रुवारी) देशभरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी चित्रपटगृहात गेले होते. चित्रपट बघताना आडवाणी यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा भावूक झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Lal Krishna Advani getting emotional).
‘शिकारा’ चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर लालकृष्ण आडवाणी यांचा चित्रपटगृहातील व्हिडीओ शेअर केला आहे (Lal Krishna Advani getting emotional). या व्हिडिओत आडवाणी यांना रडताना बघितल्यावर विधू चोप्रा त्यांच्याकडे जाताना दिसतात.
“लालकृष्ण आडवाणी शिकाराच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी आले होते. आपला आशीर्वाद आणि सद्भावनेमुळे आम्हाला अत्यंत आनंद झाला”, असं विधू चोप्रा इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओसोबत म्हणाले.
‘शिकारा’ चित्रपटात प्रेमकथा दाखवली आहे. हा चित्रपट काश्मीरमध्ये पंडितांवर झालेल्या अन्यायावर आधारित आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आदिल खान आणि अभिनेत्री सादिया यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट काल (7 जानेवारी) प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 75 लाखांची कमाई केली.