PHOTO | कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे (Lighting on Vitthal temple on Kartik Ekadashi).
विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे.
Follow us on
येत्या 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रतिकात्मक स्वरुपाच्या कार्तिकी यात्रेच्या सोहळ्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर कार्तिकवारी प्रतिकात्मक स्वरुपाची, भाविकाविना होत असली तरी पुणे येथील विठ्ठल भक्त विनोद जाधव आणि निलेश जाधव यांनी सेवा म्हणून विनामूल्य मंदिर समितीचे प्रवेशद्वार, मंदिराचे शिखर, सात मजली दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.
विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे.
आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा दिवस वारकरी सांप्रदायासाठी प्रचंड आनंद आणि उत्साहाचा दिवस असतो. पंढरपुरात या दोन्ही दिवशी मोठी जत्रा भरते. हजारो भाविक पंढरपुरात दाखल होतात. मात्र, यावेळी कोरोनाचं सावट आहे.
कोरोनामुळे यावर्षी आषाढी एकादशीची यात्रा रद्द झाली. त्यानंतर कार्तिक एकादशीदेखील तशाच स्वरुपाची होणार आहे.
कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूर आणि परिसरातील 8 ते 10 गावांमध्ये संचारबंदी लावण्यात येणार आहे.
कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून शेकडोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या पंढरीत दाखल होत असतात. राज्य शासनाने या सर्व सोहळ्यांना बंदी घातली आहे. कोरोना संसर्गामुळे आषाढी यात्रेनंतर कार्तिक वारी ही निर्बंधातच होणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पंढरपूरमध्ये येणारी एसटी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 22 ते 26 नोव्हेंबर रोजी बाहेर गावातून पंढरपूर कडे येणारी सर्व एसटी वाहतूक बंद राहणार आहे. कार्तिक यात्रेच्या पाश्वर्भूमीवर प्रशासनाकडून वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.