मुंबई : जागतिक फुटबॉलमधील महान फुटबॉलर्सपैकी एक म्हणजे अर्जेंटिना ना देशाचा कर्णधार लिओनल मेस्सी (Lionel Messi). या महान फुटबॉलरचा आज(24 जून) वाढदिवस असून तो 34 वर्षांचा झाला आहे. अर्जेंटिना देशात एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला मेस्सी एकदिवस फुटबॉल जगतावर राज करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. त्यात बालपणीच एका गंभीर आजाराने ग्रासलेला छोटा मेस्सी जगातील सर्वांत मोठा फुटबॉलर होईल याचा कोणी विचारही केला नव्हता. पण मेहनत आणि खेळाशी निष्ठा ठेवून मेस्सीने हे करुन दाखवलं…
मेस्सीचे आज जगभरात करोडो चाहते आहेत. जगातील सर्व क्लब्स मेस्सीला स्वत:च्या संघात सामिल करण्यासाठी त्याला कोट्यवधीच्या ऑफर्स देतात, मात्र मेस्सीने बार्सिलोना फुटबॉल क्लब गेल्या 20 वर्षानंतरही सोडलेला नाही. याच कारणही मेस्सीच्या खेळासारखच खास आहे. 14 वर्षांचा असताना बार्सिलोना संघासोबत जोडला गेलेला मेस्सी आज 34 वर्षांचा झाला असला तरी अजूनही बार्सिलोनाकडूनच खेळत आहे.
लिओनल मेस्सी अवघ्या 6 वर्षांचा असताना अर्जेंटिनाच्या रोजारियो येथील ‘न्यूएल्स ओल्ड बॉयज क्लब’ सोबत जोडला गेला. वडिलांनी फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरणा दिलेल्या मेस्सीसोबत दररोज सरावासाठी त्याची आज्जी सोबत असायची. बालपणीपासूनच अथक मेहनत करणाऱ्या मेस्सीला अवघ्या 10 वर्षांचा असताना ‘ग्रोथ हार्मोन डिफिशिएन्सी’ या गंभीर आजाराने ग्रासलं. या आजारात व्यक्तीची शाररिक वाढ खुंटते. त्यामुळे हा आजार मेस्सीवर पूर्णपणे हावी झाला असता तर मेस्सी कधीच फुटबॉल खेळू शकला नसता. आजाराचा खर्चही खूप असल्याने मेस्सीची फॅमिली चिंतेत होती. त्यावेळी मेस्सीचा अप्रतिम खेळ पाहून बार्सिलोना संघाने त्याला खेळण्याची ऑफर दिली आणि उपचाराचा खर्च उचलणार असल्याचेही कबूल केले. त्यानंतर मेस्सी बार्सिलोनासोबत जोडला गेला साध्या टिशू पेपरवर मेस्सीला पहिलं कॉन्ट्रेक्ट लिहून दिलं आणि 14 वर्षांचा मेस्सी बार्सिलोनामध्ये सामिल झाला. त्यानंतर मेस्सीने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि बघता बघता यशाची एक एक शिखरं सर केली आणि संघासह स्वत:ला सर्वोच्च स्थानी पोहोचवलं.
मेस्सीने बार्सिलोना संघाकडून खेळताना आतापर्यंत 634 गोल्स केले आहेत. तसेच फुटबॉलमधील सर्वात मानाचा असणारा पुरस्कार बलॉन डी -ऑरही मेस्सीने सर्वाधिक म्हणजे 6 वेळा पटकावला आहे. मेस्सीने बार्सिलोना संघाला अनेक मोठ्या स्पर्धा जिंकवून दिल्या असल्यातरी आपल्या देशाला अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकवून देण हे मेस्सीचं सर्वात मोठं स्वप्न आहे.
हे ही वाचा –
तिन्ही लीगमध्ये रोनाल्डोचाच डंका! इंग्लंड, स्पेन गाजवल्यानंतर आता इटलीतही रोनाल्डोची यशस्वी वाटचाल
देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी 39 वर्षीय खेळाडू मैदानात, निवृत्तीच्या 5 वर्षांनी पुनरागमन
(Lionel Messis Birthday today Who is still playing with Barcelona after Club Helped him in Career Threatening Disease )