औरंगाबाद : तालुक्यातील काही गावांमधील मका, बाजरी, कापूस, तूर पिकांवर (Locust Attack on Maize Bajari Cotton Tur Crop in Aurangabad) सध्या हिरव्या रंगाच्या नाकतोड्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला चढवला आहे. त्यामुळे पाच-सात हजार एकरवरील पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांना टोळधाड असल्याचं वाटतं आहे. मात्र, हा टोळधाडीचा प्रकार नसून छोटा नाकतोडा असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलंआहे.
औरंगाबादपासून जवळच असलेल्या बीड रस्त्यावरील झाल्टा, गांधेली, आडगाव, निपाणी, चिंचोली, परदरी, एकोड, पाचोड, टाकळी परिसरातील शेतातील पिकावर नाकतोड्यांनी हल्ला चढवला आहे. मका आणि कडूळ या पिकांवर सध्या हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या लहान-लहान आकाराच्या नाकतोड्यांनी हल्ला चढवला आहे. पावसामुळे जिथे जादा गवत आलं आहे, त्याच्या जवळच्या शेतातील पिकांवर नाकतोड्यांचा हल्ला होत आहे. नाकतोडे एका पिकावरुन दुसऱ्या पिकावर जाऊन बसत आणि सरळ मका, कडुळाची पाने कुरतडून टाकत आहेत.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“आमच्या गावात 25 ते 30 एकररवरील शेतीचे क्षेत्र असून पिके टोळधाडीने धोक्यात आल्याची भीती निर्माण झाली होती. दहा ते बारा पाने असलेल्या पिकांना आता दोन ते तीनच पाने शिल्लक राहिली आहेत. गावातील कडूळ, मक्यावर नाकतोडे हल्ला चढवून पिके फस्त करत आहेत”, असं सरपंच भाऊसाहेब दसपुते यांनी सांगितलं (Locust Attack on Maize Bajari Cotton Tur Crop in Aurangabad).
कृषी विभागाच्या पथकाने औरंगाबाद परिसरातील शेतात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. हा टोळधाडीचा प्रकार नसून ज्या गावातील पिकांवर छोट्या नाकतोड्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला चढवला आहे. हा प्रकार टोळधाडीचा नसल्याचं सांगत शेतकऱ्यांनी भीती बाळगू नये, असं आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता क्लोरोपायरीफॉस 20 e.c 24 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 e.c 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 e. c 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी बांधावर आणि पिकावर करावी. फवारणी केल्यानंतर 1 महिन्यांच्या आत जनावरांना चारा वापरु नये, असं आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ किशोर झाडे यांनी केलं आहे.
उचलली रिस्क, प्रॉफिट फिक्स! बीडमध्ये शतावरीचं पीक घेऊन तब्बल 10 लाखांचं उत्पन्न!https://t.co/DBoRVpjhFC @dadajibhuse
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2020
Locust Attack on Maize Bajari Cotton Tur Crop in Aurangabad
संबंधित बातम्या :
कृषी विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर COVID19 चा उल्लेख नसेल, कृषी मंत्री दादा भुसे यांची ग्वाही
Wardha Farmers | पेरलं ते उगवलंच नाही! वर्ध्यात बोगस बियाणाने शेकडो एकरवरील सोयाबीन पेरणी बाद