मुंबईः महाराष्ट्र विधानसभा अधिनेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर आहेत. मात्र अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आहेत तिथूनच सभागृहावर नियंत्रण ठेवत आहेत.
आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री सभागृहात येणार का, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, ‘अधिवेशन उत्तम पद्धतीने सुरू झालं आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री जिथून आहेत तिथून अधिवेशन नियंत्रित करत आहेत. सरकारच्या कामकाजात सहभागी होत आहेत. आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे वेट अँड वॉच.. पहा काय होतंय ते.”
विधानसभा अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया कशी घ्यायची यावरून सध्या वाद सुरु आहे. महाविकास आघाडी आवाजी पद्धतीने अध्यक्षांची निवडणूक घेणार आहे, मात्र राज्यपालांनी यावर आक्षेप घेतला आहे. याविषयीच्या प्रश्वावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे उत्तर पाठवलं ते तुमच्या समोर आहे. राज्यपालांनी इतका अभ्यास करू नये. घटनेतील तरतूदीनुसार काम करण्यासाठी राज्यपालांनी नियुक्ती होते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारशी आणि लोकभावना या डावलून काम करण्यासाठी राज्यपालांनी नियुक्ती होत नाही. राज्यपाल अभ्यासू आहेत. विद्वान आहेत, पण त्या अभ्यासाचं आणि विद्वतेचं अजीर्ण होऊ नये. सध्या राज्याच्या राजभवनात अभ्यासाचं अजीर्ण झालेलं आहे. अजीर्ण झालं की पोटाचा त्रास होतो. असा त्रास काही लोकांना होत असेल तर राज्याचं आरोग्य खातं उपचार करायला सक्षम आहे.
इतर बातम्या-