पुणे : बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत बारावी आणि दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. ( SSC Exam and HSC Exam Date Declered )
दहावीची लेखी परीक्षा ०२ मार्च ते २५ मार्च या दरम्यान होणार आहे. इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सप्टेंबर पासून उपलब्ध करून देण्यात आलेली असून, सदर वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून बारावी आणि दहावीची वेळापत्रके अंतिम करण्यात आलेली आहेत.
Central Board of Secondary Education : सीबीएसईकडून देखील गुरुवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाची परीक्षा ही फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. CBSE दहावी बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान होणार आहे.
CBSE 12th exam 2023 : सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते ५ एप्रिल २०२३ या कालावधीत होणार आहे.