महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. सकाळी साडेबारा वाजल्यापासून दोन्ही बाजूनं युक्तिवाद करण्यात आला. ईडीनं 14 दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयानं अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
देशातल्या मोठ्या केंद्राचं उदघाटन पाटीवर माझं नाव टाकलं मी आभार मानतो
पवारसाहेब दगडालाही पाझर फोडू शकतात
अनेकजण परदेशात जातत, पण अभ्यास करतात का ते माहिती नाही, परदेशात जाऊन गुनगान गायचं
आम्ही लंडनला गेलो होतो, मुले लहान होती, टॅक्सीतून जाताना समोरुन मराठी माणूस पॅलेस दाखवत म्हणाला असं कधी होणार
गाडीतून येताना अजितदादा सांगत होते पुण्यानंतर बारामती नंबर दोनचं केंद्र बनेल
मी केंद्र पाहण्यासाठी स्वतंत्रपणे येणार, मुलांना घेऊन येणार
दिवाळी सुरु झालीये काहीजण म्हणतात की फटाके फोडणार.. फटाके फोडा पण धूर काढू नका..
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अजितदादा आपण संगितलं अडचण होती.. ती अडचण काय होती ते सांगतो.. गेल्या आठवड्यापासून माझे पाय धरलेत.. कोणी पाय धरण्याएवढा मी मोठा नाही.. मी स्वत:च्या पायावर उभं राहायला सक्षम
पवारसाहेबांसारखा तरुण, त्यांनी विकास घडवला,
माझी बारामतीत दुसऱ्यांदा चक्कर, पवारसाहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करतात.. पण सगळे पवार कुटुंबीय मनापासून काम करतात
सगळं कुटुंब रंगलंय विकासात
ऱाजकारणात टीकाकार असतात, असलेच पाहिजेत, आम्हीही होतो तुमच्या टीकाकार
साहेबांची आणि बाळासाहेबांची मैत्री सर्वशृत, राजकारण असतं
पण चांगल्या कामात राजकारण आणू नये
तरुणांमध्ये कल्पना असतात, अडथळे आणू नयेत, त्यांना बळ देण्याचं काम संस्था करतात
मी मनात विचार करत होतो, राजकारणात इनक्युबेशन सेंटर पाहिजे, आमचंही होतं
आम्हीही नको ती अंडी उबवली, पुढे काय झालं हे सर्वांनी पाहिलं
अनिल देशमुखांना घेऊन ईडीचे अधिकारी कोर्टात पोहोचले
ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार कोर्टात दाखल
ईडीकडून रिमांड अॅप्लिकेशन तयार
अनिल देशमुखांना थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार
अनिल देशमुख यांना घेऊन ईडीचे अधिकारी कोर्टाकडे रवाना
यापूर्वी त्यांची मेडिकल तपासणी करण्यात आली
अनिल देशमुखांच्या कोठडीची मागणी झाल्यास विरोध करणार
देशमुखांनी ईडीच्या चौकशीवला नेहमीच सहकार्य केलं
अनिल देशमुखांचे वकील इंद्रपाल सिंहांची माहिती
बारामती :
– अटल इनक्युबेशन सेंटर उद्घाटन
– संस्थेच्या कामाबाबत लघुपट दाखवला जात आहे..
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती..
आम्ही नियमित कर भरत असतो आम्ही चोर नाही
पुराव्यांशिवाय काहीही खोटे आरोप करु नका
तुम्हाला खोटं वाटत असेल तर कोर्टात जा
घड्याळाबाबत मलिक जे बोलले ते गिफ्ट दिलेलं माझ्या आईनेच १७ वर्षांपूर्वी ते गिफ्ट दिलं होतं
अटल इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राच्या उदघाटन कार्यक्रम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरेंसह बारामतीत दाखल
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित
संपूर्ण पवार कुटुंबाची कार्यक्रमाला उपस्थिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीत दाखल
पवार आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर
– इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थिती
– त्यानंतर आप्पासाहेब पवार सभागृहात मुख्य सभेसाठी जाणार
– संजय राऊत
अनिल देशमुखच आहेत का फक्त समन्स द्यायला
खडसे मलिकांचा जावईच आहे का अटक करायला
भाजपच्या कोणाला अटक केलेली दिसत नाही
भाजपची लोकं क्रूर, राक्षस गणाची आहेत
हे हिंदुत्वाचं नाव घेतात पण अशी व्याख्या नाही
२०२४ ला जे काही होणार ते पाहू ना
तेव्हा कळेल केंद्रीय तपास यंत्रणा काय करतात
तुमच्याही फाईल्स आमच्याकडे आहेत
पण आमची ही वृत्ती नाही
अनिल देशमुख मेडिकल तपासणीसाठी रवाना
मेडिकल झाल्यानंतर त्यांना कोर्टात नेलं जाणार
दुपारच्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाणार
– अनिल देशमुख यांना झालेली अटक दुर्दैवी
– त्यांना लवकर जामीन मिळेल अशी आशा आहे
– संपूर्ण देशातच हे सुरू आहे
– ज्या ज्या ठिकाणी भाजप व्यतिरिक्त सरकार तिथे असे प्रकार सुरूच आहेत
– किरीट सोमौय्या यांना आधी कळत, नंतर कारवाई होते
मी एक व्हॉट्सअॅप चॅट शेअर करतो
यात यास्मिन वानखेडे ड्रग्ज केसबाबत बोलत आहेत
बॉलिवुडच्या कोणत्याच व्यक्तीला अटक नाही
यातून पैसे उकळले जात आहेत हे स्पष्ट होतं
अनिल देशमुख काल ईडीकडे हजर झाले
त्यांना देखील फसवण्यात आलं
परमबीर सिंह सध्या बेपत्ता आहेत
मात्र जे निर्दोष ते हजर झालेत
परमबीर सिंह कुठे आहेत ही केंद्र सरकारची जबाबदारी
भयंकर खेळ या देशात सुरु
ड्रगचं कुठे ना कुठे राजकीय कनेक्शन
राजकीय संरक्षणाखाली ड्रग्जचा धंदा सुरु
– नवाब मलिक
समीर वानखेडेंचं शर्ट 70 हजार रुपयांचं कसं?
रोज नवीन कपडे घालतात
हे तर मोदींच्याही पुढे गेले
पँट लाखाची, पट्टा दोन लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घडी 50 लाखांची
याचे सर्व फोटो मी तुम्हाला देईल
प्रामाणिक अधिकारी १० कोटीचे कपडे घालत असेल
यापेक्षा प्रामाणिक कोणी नाही
एनसीबीच्या कार्यालयात किरण गोसावी काय करत होता
१५ दिवसांपासून कार्यक्रमाची तयारी सुरु होती
वानखेडेच पूर्ण फर्जीवाडा करत होते
आम्ही पहिलेपासून यावर प्रश्न केलेत
वानखेडेंनी एक प्रायव्हेट आर्मी सुरु केली आहे
गोसोवी, फ्लेचर पटेल, सॅम डिसुजा हे त्या आर्मीत होते
प्रायव्हेट आर्मीचे हे सर्व प्लेअर होते
काल फडणवीस म्हणाले की मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडेल
तुम्हाला प्रतिक्षा करण्याची गरज नाही
माझे अंडर्वल्ड कनेक्शन आहेत
६२ वर्षांचं जीवन याच मुंबई शहरात गेलं
कुणाची इतकी हिम्मत नाही की माझं अंडर्वल्ड कनेक्शन असल्याचा आरोप करतील
माझं घर काचेच नाही
तुम्ही पाच वर्षांपर्यंत मुख्यमंत्री होते, गृह खातं तुमच्याकडे होतं
जर कोणी त्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित करत असले तर तो नवाब मलिक होता
माहिम येथील जरीवाला चाळीत भ्रष्टाचार झालाय, कमिशन बसवण्यात आले
माझ्यावर हे आरोप होते की नवाब मलिकांनी कोर्टाच्या आरोपांना डिफाय केलंय
फडणवीसांनी म्हटलं की मी आरोप केल्यावर कधीही माफी मागत नाही
तुमचा निकटवर्तीय वानखेडे आहे, पंचनामा मागवून घ्या, नवाब मलिकांच्या जावयाच्या घरुन कुठल्याही प्रकारची आपत्तीजनक वस्तू आढळून आली नाही
देवेंद्र फडणवीस माफी मागणार का
जयदीप राणाबाबत मी काही माहिती पुढे ठेवली होती
जो एका गाण्याचा फायनान्स हेड होता
कालपासून असं म्हटलं जात आहे की कोणाच्या पत्नीला यात सामील करत आहेत
दोन महिलांव्यतिरिक्त मी कुठल्याही महिलेविषयी आरोप किंवा उल्लेख केलेला नाही
फक्त अमृता फडणवीसच महिला आहेत काय?
मी काल जे ही आरोप केलेत ते हवेत केले नाहीत. ड्रग्ज पेडलर हा गाण्याचा फायनान्स हेड आहे, हे मी सगळ्यांसमोर आणलं
काल किरीट सोमय्या यांनी अजित पवारांच्या आई, बहिणींचा उल्लेख केला
त्यापूर्वी संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीच्या कार्यालयापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं
खडसेंच्या पत्नींना ईडीच्या कार्यालयापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं
किरीट सोमय्या हे राज्याच्या मुख्यमंत्र्य़ांच्या पत्नीचं नाव घेऊन त्यांच्यावर वारंवार आरोप करत राहिले
काल मी जे काही आरोप लावले ते हवेत लावले नाहीत
कोल्हापूर
विधान परिषदेसाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता
15 नोव्हेंबरपासून आचारसहिता लागू होण्याचा अंदाज
प्रशासकीय पातळीवर सुरू झाली निवडणुकीसाठीची लगबग
तर आचारसंहिता लागण्याआधी लागला विकास कामांच्या मंजुरीचे
कोल्हापूर च्या जागेसाठी पालकमंत्री सतेज पाटील रिंगणात असणार
सतेज पाटील यांच्याविरोधात भाजप कडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत ही मोठी उत्सुकता
कोल्हापूर
गोकुळ दूध संघाने पार केला 15 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा
गेल्या चार महिन्यात दूध संकलनात एक लाख 85 हजार लिटरची वाढ
म्हशीच्या दुधात सर्वाधिक एक लाख 29 हजार लिटरची वाढ तर गायीच्या दुधाच संकलन ही 75 हजार लिटरन वाढलं
पशुखाद्य विक्रीतही गाठला नवा उच्चांक
12 हजार 400 टन जादा पशुखाद्याची झाली विक्री
सोलापूर –
स्थापनेपासून बिनविरोध होणाऱ्या मोहोळ तालुक्यातील अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायत झालेले रूपांतर
नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्याचा राज्य सरकारचा आदेश
खंडोबाचीवाडी, नालबंदवाडी, कुरणवाडी कोंबडवाडी या चारवाड्यांचा अनगर नगरपंचायतीमध्ये समावेश
सोलापूर –
सोलापुरात दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या नऊ जणांचा पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बार्शी तालुक्यातील काटेगाव जवळलिल नाकाबंदीच्या ठिकाणी दरोड्यासाठी गाडीतून जाणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
चटणी, स्क्रू ,ड्रायव्हर, कटावणी व दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी केले जप्त
पोलिसांच्या ताब्यात असलेले नऊ दरोडेखोर उस्मानाबाद जिल्ह्याचे रहिवासी
पुणे
भाजपच्या वतीने कोथरुडमध्ये दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन
सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने पुणेकर रसिक मंत्रमुग्ध
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित