Maharashtra News LIVE Update | औरंगाबादेत लस घेतली असेल तरच मिळणार दारू, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा निर्णय

| Updated on: Nov 24, 2021 | 12:54 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | औरंगाबादेत लस घेतली असेल तरच मिळणार दारू, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा निर्णय
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Nov 2021 10:47 PM (IST)

    औरंगाबादेत लस घेतली असेल तरच मिळणार दारू, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा निर्णय

    औरंगाबाद : औरंगाबादेत मद्यप्रेमींसाठी धक्कादायक बातमी

    लस घेतली असेल तरच मिळणार दारू

    लसीचा एकही डोस जर झाला नसेल तर सॉरी

    लसीचा डोस घेतला नसेल तर दारूचा विषय सोडा

    लस घेतली नसेल तर तुम्हाला औरंगाबाद शहर जिल्ह्यात मिळणार नाही दारू

    औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय

  • 23 Nov 2021 09:20 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर हल्ला

    अंबरनाथ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर हल्ला

    मोबाईल टॉवरच्या वादातून सख्ख्या भावानेच हल्ला केल्याची माहिती

    मोबाईल टॉवर दुरुस्ती करणाऱ्या इंजिनिअरलाही पाटील यांच्या भावाने केली मारहाण

    सदाशिव पाटील हे मध्ये पडताच त्यांनाही धक्काबुक्की करत मारहाण

    शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जनार्दन पाटील आणि त्यांचा मुलगा कल्पेश यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल


  • 23 Nov 2021 08:10 PM (IST)

    उद्या 11 वाजता आम्ही परत येऊ, पुन्हा एकदा चर्चा होईल- सदाभाऊ खोत

    सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलत आहेत. उद्या निलंबित झालेले एसटी कर्मचारी आझाद मैदानावर येणार आहेत. त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. आज सरकार दोन पावलं पुढं आलं आहे. सरकारने विलीनीकरणाबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. आम्ही कामगारांशी चर्चा केली. उद्या 11 वाजता आम्ही परत येऊ, उद्या पुन्हा एकदा चर्चा होईल.

  • 23 Nov 2021 07:51 PM (IST)

    आंदोलन कर्मचाऱ्यांचं आहे, कर्मचाऱ्यांशी बोलल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही- गोपीचंद पडळकर

    गोपीचंद पडळकर तसेच सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलत आहेत. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणावर आम्ही ठाम आहोत. कोर्टाच निर्णय येत नाही तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही असं परब यांनी सांगितलं. एसटी महामंडळाचा पगार कमी आहे. पगार मागेपुढे होतो या अडचणी सरकारच्या लक्षात आलं. हे आंदोलन कर्मचाऱ्यांचं आहे. कर्मचाऱ्यांशी बोलल्याशिवाय आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. उद्या आम्ही परत येऊ, असं आम्ही परब यांना सांगितलं.

  • 23 Nov 2021 07:46 PM (IST)

    अंतरिम पगारवाढीचा पर्याय कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासमोर ठेवला, उद्या पुन्हा चर्चा : अनिल परब

    संप मिटण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न सुरु आहे. संप मिटावा म्हणून आमचा प्रयत्न आहे. संप लांबतोय त्यामुळे कर्मचारी तसेच एसटी महामंडळाला तोटा होतोय. शाळकरी मुलांना अडचणी येत आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा मी विनंती करतो. उद्या पुन्हा एकदा चर्चा केली. समितीचा अहवाल येईल तोपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ वाढ देता येईल, असा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे.

  • 23 Nov 2021 07:43 PM (IST)

    उद्या 11 वाजता पुन्हा एकदा बैठक होणार- अनिल परब

    अनिल परब माध्यमांशी बोलत आहेत. आजची बैठक संपली आहे. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत चर्चा करण्यात आला आहे. याबाबत उच्च न्यायालयाने समिती स्थापन केलेली आहे. या समितीचा अहवाल येईल तो मुख्यमंत्र्यांतर्फे हायकोर्टाला द्यायचा आहे. या आदेशाचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही. सरकारकडून जी माहिती हवी आहे ती दिली जात आहे. एकाप्रकारे ही प्रोसेस पुढे जात आहे. याला वेळ लागणार आहे. जो समितीचा अहवाल येईल तो राज्य सरकार मान्य करेल. चर्चा सकारात्मक झाली. उद्या सकाळी 11 पुन्हा एकदा बसयचं आहे. त्यानंतर ठरणार आहे.

  • 23 Nov 2021 07:30 PM (IST)

    अहमदनगरात चारित्र्यावर संशय घेणाऱ्या सासऱ्याचा दगडाने ठेचून खून, सुनेला अटक

    अहमदनगर : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या सासऱ्याचा सुनेनं भर रस्त्यात कुऱ्हाडीने वार करून दगडाने ठेचून केला खून

    नगर तालुका पोलिसांनी केली सुनेला अटक, घटनेने एकच खळबळ

    नगर तालुक्यातील जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील येथे घडली घटना

    अर्जुन गोविंद हजारे वय 63 असं हत्या झालेल्या सासऱ्याचं नाव

    तर सून ज्योती अतुल हजारे हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

  • 23 Nov 2021 07:00 PM (IST)

    अहमदनगर जिल्‍ह्यात 22 ते 28 नोव्‍हेंबरदरम्‍यान 144 कलम लागू

    अहमदनगर : जिल्‍ह्यात 22 ते 28 नोव्‍हेंबरदरम्‍यान 144 कलम लागू

    या कालावधीमध्‍ये पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्र येण्‍यास सक्‍त मनाई

    जिल्हयात विविध राजकीय पक्ष, संघटना यांचे वतीने विविध मागण्यांसाठी रास्तारोको, मोर्चा, धरणे आंदोलन

    इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असतात.

    त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

  • 23 Nov 2021 06:58 PM (IST)

    साहित्य संमेलनाला जावेद अख्तर उद्घाटक म्हणून येणार नाहीत, प्रमुख पाहुणे म्हणून येणार, सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांची माहिती

    नाशिक -जावेद अख्तर हे उद्घाटक म्हणून येणार नाहीत तर प्रमुख पाहुणे म्ह्णून येणार

    उद्घाटक हे एक साहित्यिक असावेत म्हणून आम्ही गुलजार यांना आमंत्रित केले होते

    पण प्रकृर्ती अस्वास्थ्यामुळे त्यांनी नकार दिला

    त्यानंतर आम्ही विश्वास पाटील यांना उद्घाटक म्ह्णून आमंत्रित केले

    त्यामुळे उद्घाटक विश्वास पाटील हेच असतील

    जावेद अख्तर हेीमुस्लिम असलेतरी गुलजार हे हिंदू होते

    त्यामुळे जो विरोध गुलजार यांना होता त्यात काही तथ्य नाही

    साहित्य संलनाचे सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांची माहिती

  • 23 Nov 2021 06:11 PM (IST)

    2024 मध्ये राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष करायचा आहे- जयंत पाटील 

    महाबळेश्वर – 2024 मध्ये राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष करायचा आहे- जयंत पाटील

    – नरेंद्र मोदी हे सहजासहजी माघार घेणारे नाहीत

    – त्यांनी माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झाला होता

    – ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने परत कायदे आणणार

  • 23 Nov 2021 05:49 PM (IST)

    वाळूज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी

    औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली

    लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू

    जायकवाडी धरणातून आलेल्या मुख्य लाईन फुटल्यामुळे पाण्याची नासाडी

    पाईपलाईन फुटल्यामुळे वाळूज पाटोदा औरंगाबाद रस्ता पडला बंद

    पाण्याच्या प्रेशरमुळे खचला रस्ता

    खचलेल्या रस्त्यात फसला मालवाहू ट्रक

  • 23 Nov 2021 05:32 PM (IST)

    अनिल परब यांची एसटी कर्मचारी आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर उपस्थित

    मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी कर्मचारी आंदोलक यांच्याबरोबर बैठक

    सह्याद्री अतिथीगृह इथ बैठक

    बैठकीला सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर एसटी कर्मचारी परिवहन आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित

    आज वेतना संदर्भात चर्चा होणार

  • 23 Nov 2021 04:18 PM (IST)

    नागपूर जिल्हयात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य, काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित

    नागपूर – नागपूर जिल्हयात महाविकास आघाडीत नाराजीनाट्य

    – काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांचा उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित

    – ‘नाना पटोले विदर्भात राष्ट्रवादीचं दुकानं बंद करण्याची भाषा करतात’

    – ‘उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसने आम्हाला बोलावलं नाही’

    – ‘काँग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधला नाही’

    – ‘नागपूर जिल्ह्यात काँग्रेस आम्हाला दुय्यम वागणूक देतात’

    – ‘वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत आम्ही विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेससोबत नाही’

    – राष्ट्रवादीचे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर यांची नाराजी

  • 23 Nov 2021 01:53 PM (IST)

    खासदार प्रीतम मुंडे पत्रकारांवर भडकल्या

    बीड :

    खासदार प्रीतम मुंडे पत्रकारांवर भडकल्या

    पत्रकारांनी प्रश्न विचारल्याने खा. मुंडे नाराज

    ऑन द रेकॉर्ड किंवा ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला कसं वाजवायचं तसं वाजवा

    खासदार म्हणून जशी माझी जबाबदारी, तशीच पत्रकार म्हणून तुमची जबाबदारी

    विरोधीपक्ष म्हणून तुम्हाला खासदारांचा आवाज तुम्हाला सक्षम वाटत नाही,

    तर i am sorry to say.. मीडिया म्हणून मलाही तुमचा आवाज सक्षम वाटत नाही

    बीडच्या पत्रकार परिषदेत खा. प्रीतम मुंडेंचं वक्तव्य

  • 23 Nov 2021 01:42 PM (IST)

    नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

    – नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

    – विदेशी मद्यासह तब्बल 84 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

    – कळवण मध्ये केली भरारी पथकाने कारवाई

  • 23 Nov 2021 12:37 PM (IST)

    आंदोलनानंतर ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून आरक्षणाला संरक्षण देण्याचं ढोंग घेतलं आहे – पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे –

    ओबसी आणि बहुजनांना अंधारात लोटणारा निर्णय सरकारच्या काळात झाला

    ओबीसीचं आरक्षण रद्द झालं, ओबीसीचं आरक्षण स्थगिती होण्यापासून रद्द होईपर्यंत जो कालावधी मिळाला त्यात पावलं उचलली असती तर आरक्षण वाचलं असतं

    इम्पेरिकल डेटा दिला नाही, आयोग स्थापन केला पण निधी दिला नाही

    सातवेळा तारखा वाढवून मागितल्या, काही केलं नाही, या सरकारला असुरक्षित करायचं आहे की काय, आरक्षण संपुष्टात आणायचं की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे

    आंदोलनानंतर ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढून आरक्षणाला संरक्षण देण्याचं ढोंग घेतलं आहे

    या अध्यादेशाविरोधात लोक औरंगाबाद खंडपीठात गेले आहेत

  • 23 Nov 2021 12:35 PM (IST)

    आता लोक तुमच्या महाराष्ट्रात काय चाललं असं विचारतात – पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे –

    महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर राज्याच्या बाहेर गेल्यावर पूर्वी लोक महाराष्ट्राचं उदाहरण देऊन काम करत होते

    आता लोक तुमच्या महाराष्ट्रात काय चाललं असं विचारत आहे

    सत्ता परिवर्तनानंतर आघाडी सरकार आलं

    त्यांनी जनहिताचं काम करायला हवं होतं पण केलं नाही

    अनुभवी नेते सत्तेत आहेत, त्यांना जनतेची नाडी माहिती आहे

    त्यांनी जनहिताची कामे करायला हवी होती ती केली नाही

  • 23 Nov 2021 12:31 PM (IST)

    मंदाकिनी खडसे यांची ईडीची चौकशी संपली

    मंदाकिनी खडसे यांची चौकशी संपली

    ईडीची चौकशी संपली

    आज 10 व्यानंदा झाली चौकशी

    पुणे येथील जमिन घोटाळ्यात झालेल्या मनी लोंदरिंग प्रकरणात झाली चौकशी

  • 23 Nov 2021 12:01 PM (IST)

    खासदार असदुद्दीन ओवैसी विनानंबर प्लेटच्या गाडीतून आले

    सोलापूर –

    खासदार असदुद्दीन ओवैसी विनानंबर प्लेटच्या गाडीतून आले

    सोलापुर शहर वाहतूक पोलिसांनी केला 200 रुपयांचा दंड

    शासकीय विश्रामगृहात शहर वाहतूक पोलिसांचा दणका

    गाडीच्या समोरच्या भागाला नंबर प्लेट नसल्यामुळे पोलिसांची कारवाई

    सेंट्रल मोटार विकल रुल 50/177 नुसार दंडात्मक कारवाई

  • 23 Nov 2021 11:33 AM (IST)

    अमरावती नांदेड येथे झालेल्या घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करा – चंद्रकांत पाटील

    कोल्हापूर –

    अमरावती नांदेड येथे झालेल्या घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करा

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

    माजी मंत्री सुभाष देशमुख देशमुख, समरंजितसिह घाटगे उपस्थित

  • 23 Nov 2021 11:31 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्याचा प्रस्ताव मंजूर

    पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्याचा प्रस्ताव मंजूर

    मळवलीचं नाव एकविरा करण्याचा प्रस्ताव मंजूर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

    जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद पाठवणार राज्य सरकारकडे नाव बदलीचा प्रस्ताव.

    जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

  • 23 Nov 2021 10:29 AM (IST)

    परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

    परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात…

    – पोलिसांनी तीन किलोमिटरच्या रेडियसमध्ये १५ ठिकाणी केली बॅरिकेटींग…

    – एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाचा आजचा चौदावा दिवस…

    – शरद पवारांसोबत झालेली बैठकही निष्फळ ठरल्याने आंदोलक आक्रमक…

    – एसटी कर्मचारी एक्शन मोडमध्ये तर पोलीस अलर्ट मोडमध्ये

  • 23 Nov 2021 10:28 AM (IST)

    सोलापुरात खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट तिप्पटीने  पैसे वसूल

    सोलापूर –

    खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट तिप्पटीने  पैसे वसूल

    प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने दिली आहे खासगी वाहतुकीला परवानगी

    बसस्थानकाच्या आवारातुन दिली आहे खासगी वाहतुकीला परवानगी

    खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून प्रवाशांची अडवणूक

  • 23 Nov 2021 10:26 AM (IST)

    औरंगाबादेत लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन आणखी आक्रमक

    औरंगाबादेत लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन आणखी आक्रमक

    लस घेतलेल्या व्यक्तींनाच करता येणार बस आणि रिक्षा प्रवास

    लस न घेतलेल्या व्यक्तीने प्रवास केल्यास बस आणि रिक्षाचा परवाना करणार रद्द

    औरंगाबादचे जिल्हाधिकारी आणि परिवहन अधिकारी दोघांनी घेतला एकत्रित निर्णय

    आजपासून शहरात अंमलबजावणी सुरू

  • 23 Nov 2021 08:37 AM (IST)

    चंद्रपूर शहरात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या जोरदार सरी

    चंद्रपूर शहरात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या जोरदार सरी,

    हिवाळ्यातील पाऊस सरींनी वातावरणात गारवा,

    गेल्या 24 तासापासून आकाश होते ढगाळलेले,

    ऐन धान कापणीच्या काळात आलाय पाऊस,

    गेले 2 दिवस शहरवासीय उकाड्याने होते त्रस्त,

    या पावसाने मात्र मिळालाय दिलासा

  • 23 Nov 2021 08:08 AM (IST)

    सोलापूर महानगरपालिकेने श्री सिद्धेश्वर कारखान्याला दिलेली  मुदत उद्या संपणार

    सोलापूर –

    महानगरपालिकेने श्री सिद्धेश्वर कारखान्याला दिलेली  मुदत उद्या संपणार

    विमान सेवेस अडथळा ठरलेली चिमणी पाडण्यास नगरविकास खात्याने दिली होती परवानगी

    चिमणी पाडून घेण्यास महानगरपालिकेने कारखान्यास दिली होती सात दिवसाची मुदत

    तर महानगरपालिकेने सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी पाडण्यासाठी बंगलोर येथील बियास कॉन्ट्रॅक्ट कंपनीला दिले कंत्राट

    साखर कारखाना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यासाठी मनपा आयुक्तांचे पोलीस आयुक्तांना पत्र

  • 23 Nov 2021 08:08 AM (IST)

    अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी

    अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी,

    मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीये,

    शिवाजी रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळतीये,

    मात्र सकाळपासूनचं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केलीये

  • 23 Nov 2021 08:07 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड शहरात लस घेणाऱ्यांचे प्रमाण घटले

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड शहरात लस घेणाऱ्यांचे प्रमाण घटले

    -लसीचा साठा सांभाळण्याची महापालिका प्रशासनावर वेळ

    -शहरात काही महिन्यांपूर्वी लसीकरनासाठी रांगा, गोंधळ असे चित्र होते आता मात्र नागरिकांनी कोरोना लाट ओसरल्यानंतर नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवलीय

    -ह्या लसीचे डोस मुदतबाह्य होण्याची भीती

    -सध्या शहरात पहिला डोस 84 टक्के व दुसरा डोस 56 टक्के नागरिकांनी घेतलाय

  • 23 Nov 2021 08:05 AM (IST)

    चंदगड तालुक्यातील कलीवडे इथं पुन्हा आला टस्कर हत्ती

    कोल्हापूर

    चंदगड तालुक्यातील कलीवडे इथं पुन्हा आला टस्कर हत्ती

    महादेव शेत परिसरात मुक्त वावरताना दिसला टस्कर

    पांडुरंग कोंडेकर यांच्या सह परीसरातील शेतकऱ्यांच्या नाचणी पिकाची केली नासधूस

    तस्कर हत्ती कडून वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हैराण तर नागरिकांमध्ये भीतीच ही वातावरण

    हत्तींच्या बंदोबस्ताची वन विभागाकडून केवळ वल्गना

    वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांची नाराजी

  • 23 Nov 2021 08:04 AM (IST)

    नाशकातील वादग्रस्त पेस्ट कंट्रोल ठेक्याचा आज फैसला

    नाशकातील वादग्रस्त पेस्ट कंट्रोल ठेक्याचा आज फैसला

    निविदा रद्द करण्याच्या निर्णयाबाबत आज न्यायालयात निकाल

    तांत्रिक अडचणींचा फायदा ठेकेदाराला दिल्याचा आरोप

    न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्ष नेते काय भूमिका घेणार याकडे लक्ष

  • 23 Nov 2021 07:53 AM (IST)

    शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात

    बुलडाणा

    शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात,

    चिखली जवळ बेराळा फाट्यावर दुचाकीस्वार येऊन धडकले,

    मुंबईला बैठकीला जाताना मध्यरात्री घडली घटना,

    दुचाकीस्वार दोन्ही जखमींना घेऊन तुपकर औरंगाबादकडे रवाना

    दुचाकीस्वाराला कंट्रोल न झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती

  • 23 Nov 2021 07:26 AM (IST)

    सोलापूर महापालिका आयुक्तांनी काढलेला आदेश नगरविकास खात्याने केला रद्द

    सोलापूर महापालिका आयुक्तांनी काढलेला आदेश नगरविकास खात्याने केला रद्द

    पालिका उपआयुक्त एन .के .पाटील यांना अकार्यक्षम ठरवून आयुक्त पी शिवशंकर यांनी केले होते कार्यमुक्त

    यावर ताशेरे ओढत नगरविकास खात्याने आयुक्तांचे आदेश केले रद्द

    पाटील यांना तात्काळ रुजू करून घेण्याचे आदेश

    आयुक्तांचा हा निर्णय एकतर्फी असून वैयक्तिक वादातून निर्णय घेतल्याची एन. के. पाटील यांनी नगरविकास खात्याकडे केली होती तक्रार

  • 23 Nov 2021 06:46 AM (IST)

    नाशिक महामार्गावर अज्ञात वाहानाच्या धडकेत एकाचा मृत्यू

    मुंबई – नाशिक महामार्गावर रात्रीच्या वेळेस एका बेवारस व्यक्तीला अज्ञात वाहानाने धडक दिल्याने त्याचा जागीच चिरडून मृत्यु झाला आहे.

    मृतदेह शहापुर उपजिल्हा रुग्णालयात नेला असून वाहनाचा आदिक तपास शहापुर पोलीस करत आहेत.

  • 23 Nov 2021 06:42 AM (IST)

    लॉकडाऊननंतर प्रथमच अंगारकी संकष्टी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिर खुले

    लॉकडाऊननंतर प्रथमच अंगारकी संकष्टी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिर खुले

    सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भक्त आले आहेत

    दोन वर्षांपासून बाप्पाचे दर्शन घेतले नसल्याचे भक्तांचे म्हणणे आहे

    कोरोनाच्या काळात सर्वजण अस्वस्थ झाले होते, आता बाप्पा सर्व संकटे दूर करोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना