राज्यासाठी आनंदाची बातमी, हॉटस्पॉट जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली

| Updated on: Oct 13, 2020 | 8:07 AM

सगळ्यात जास्त रुग्ण असलेल्या पुण्यात सोमवारी गेल्या 4 महिन्यातली निच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे.

राज्यासाठी आनंदाची बातमी, हॉटस्पॉट जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली
Follow us on

नागपूर : राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना सगळ्यात जास्त रुग्ण असलेल्या पुण्यात सोमवारी गेल्या 4 महिन्यातली निच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. नागपूरही कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. पण आता मात्र, आनंदाची बातमी समोर आली आहे. नागपुरात सक्रिय कोरोना बाधीतांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 12 दिवसांत उपचार घेत असलेले 40 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे परिसरात नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असं म्हणायला हरकत नाही. (Maharashtra corona update Decrease in the number of patients nagpur)

मिळालेल्या माहितीनुसार, 12 दिवसांत प्रथमच सक्रिय कोरोना रुग्णसंख्या साडेसात हजारांवर गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 76 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत 30 मृत्यू, 658 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. संसर्गाची साखळी वेगाने वाढत असताना पालिकेच्या प्रयत्नांमुळे रुग्णसंख्या घटल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्यातही कोरोनासंबंधी दिलासादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात सोमवारी कोविड-19 ची 7 हजार प्रकरणं समोर आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसांत 7,089 समोर आले असून 165 लोकांचा मृत्यू झाला आहे तर सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. (Maharashtra corona update Decrease in the number of patients nagpur)

राज्यात आज 15,656 रुग्णांचा कोविड -19 रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. महाराष्ट्रात एकूण 15 लाख 35 हजार 315 प्रकरणांची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा हा 40,514 वर गेला आहे. राज्यात आतापर्यंत 12 लाख 81 हजार 896 लोक बरे झाले आहेत. तर सध्या एकूण 2 लाख 12 हजार 439 सक्रिय प्रकरणं आहेत.

मुंबईकरांनो सावधान
मुंबईत रोजच्या निदानाचा आकडा हा दोन हजारांच्या घरात असल्याचे समोर आले आहे. काही दिवसापासून हॉटस्पॉटमधील कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबईत वाढणाऱ्या निदानाला मुंबईकरांच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असल्याचे मत टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी मांडले. कोविड पश्चातची जीवनशैली मुंबईकरांनी अजून स्वीकारलेली नाही. मास्क घालण्याविषयी अजूनही मुंबईकरांमध्ये गांभीर्य नाही. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटत नसल्याने रुग्ण वाढत आहेत. परिणामी, मुंबई महापालिकेने याची दखल घेऊन मास्क न घालण्याविषयीच्या दंडात वाढ करावी. पालिका असो किंवा राज्य सरकार, दोन्ही प्रशासनाकडून कडक निर्बंधांची सक्ती केली जात नाही.

इतर बातम्या –

पर्यावरणावर नुसती भाषणं देऊन काय होणार? त्यासाठी धाडसाने निर्णय घ्यावे लागतात, शिवसेनेचा फडणवीसांना टोला 

नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 1 कोटी रुपये रुग्णांना परतवले, मनसेच्या पाठपुराव्याला यश

(Maharashtra corona update Decrease in the number of patients nagpur)