मुंबई: कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना 12 ते 16 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या कालावधीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद राहणार आहे. (maharashtra education department declares diwali vacation for school)
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा राज्यात शाळा सुरु करण्यात आल्या नव्हत्या. त्यावर पर्याय म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार ऑनलाइन शिक्षण सुरू झाले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाल होता. सध्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा सुरू असून शनिवारपर्यंत या परीक्षा संपणार आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने 12 ते 16 नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान, माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत. तसेच एकूण कामाचे दिवस 230 दिवस होणे आवश्यक होईल. इयत्ता 1 ली ते 5 वीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान 200 व इयत्ता 6 वी ते 8 वीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामावचे दिवस किमान 220 होणे आवश्यक आहे, असंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. (maharashtra education department declares diwali vacation for school)
VIDEO | 50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 5 November 2020https://t.co/irEx5PTxWY #NewsUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
संबंधित बातम्या:
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीत फटाके फोडताय, कारवाईला तयार राहा
सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचा एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार
(maharashtra education department declares diwali vacation for school)