कामगारांचे तीन महिन्याचे पगार थकले; एसटी महामंडळ 2 हजार कोटींचं कर्ज काढणार: अनिल परब

| Updated on: Oct 30, 2020 | 2:46 PM

कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासूनचे एसटी कामगारांचे पगार थकले आहेत. आता दिवाळीही आलीय. त्यातच इंधन खर्च आणि इतर गोष्टींसाठी पैसा लागणार असून त्याकरिता एसटी महामंडळ 2 हजार कोटींचं कर्ज काढणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

कामगारांचे तीन महिन्याचे पगार थकले; एसटी महामंडळ 2 हजार कोटींचं कर्ज काढणार: अनिल परब
Follow us on

मुंबई: कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासूनचे एसटी कामगारांचे पगार थकले आहेत. आता दिवाळीही आलीय. त्यातच इंधन खर्च आणि इतर गोष्टींसाठी पैसा लागणार असून त्याकरिता एसटी महामंडळ 2 हजार कोटींचं कर्ज काढणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. तसेच एसटीकडून राज्यसरकारकडे 3600 कोटींचा प्रस्ताव देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. (Maharashtra State Road Transport Corporation will take loan says anil parab)

अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. कोरोनाकाळात एसटीला मिळणारं २२ कोटींचं उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे एसटीचा संचित तोटाही वाढला आहे. हा तोटा साडे पाच हजार कोटींचा आहे. संचित तोटा वाढल्यानंतर उत्पन्नाची साधनं वाढली पाहिजे. नाही तर तोटा वाढतो. कोरोनामुळे उत्पन्नाची साधनं वाढण्याऐवजी उत्पन्नच बंद झालं. त्यामुळे हा तोटा वाढला आहे. त्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे पगारही थकले आहेत. त्यातच दिवाळी सारखा सण आल्याने कामगारांना पगार मिळाले पाहिजेत म्हणून आम्ही सरकारकडे 3600 कोटींचा प्रस्ताव दिला आहे. कोरोनामुळे राज्याला मोठा तोटा सहन करावा लागल्याने एसटीला मदत करावी अशी शासनाचीही परिस्थिती नाही. त्यामुळे आम्ही कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दोन हजार कोटींचं कर्ज काढण्यात येईल, असं परब म्हणाले.

कर्ज काढणं म्हणजे मालमत्ता बँकाना देणं नाही

बँकांकडे एसटीची चांगली पत आहे. त्यामुळे कर्जासाठी बँकांकडे एसटी डेपो आणि स्टँड गहाण ठेवण्याचा एसटीचा विचार आहे. त्याला परब यांनी दुजोरा दिला. एसटीची मालमत्ता तारण ठेवणं म्हणजे सर्व काही बँकांना हँडओव्हर करणं असं होत नाही. ही मालमत्ता केवळ विशिष्ट काळासाठी त्यांच्या ताब्यात राहील. नंतर पैसे दिल्यावर आपली मालमत्ता सोडवण्यात येईल, असंही ते म्हणाले. (Maharashtra State Road Transport Corporation will take loan says anil parab)

 

  • कामगारांचे तीन महिन्यांचे पगार थकले, पगार देण्यासाठी 900 कोटी रुपये हवेत
  •  एसटीला साडेपाच हजार कोटींचा तोटा
  • शासनाकडे 3600 कोटी मागितले
  • मालवाहतुकीसाठी गाड्या वापरण्याचा निर्णय घेतला

संबंधित बातम्या:

ST Bus | वेतनासाठी एसटी महामंडळ 2 हजार कोटींचे कर्ज काढणार

दिवाळीला गावी जाताय? मग एसटीनेच जा!, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीकडून हंगामी दरवाढ रद्द

(Maharashtra State Road Transport Corporation will take loan says anil parab)