नवी दिल्ली : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाल्यामुळे देशातील अनेक भागांत आज हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनाऱ्यापासून दूर जात आहे, यामुळे पश्चिमी किनाऱ्यालगत याचा काहीही परिणाम दिसणार नाही. पुढच्या 48 तासांमध्ये ते पश्चिम ते दिशेने पुढे सरकत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यात असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra weather update 19 October Light rain would like to occur over isolated places imd)
यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. यामुळे आंध्र प्रदेश, यानम आणि रायलिसमा इथं पुढचे 4 दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्कायमेटकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढच्या 24 तासांमध्ये गुजरात, नागालँड, मणिपूर, मिजोरम, त्रिपुरा आणि अंदामान व निकोबार बेटांवर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह महाराष्ट्र, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण आणि दक्षिणपूर्व राजस्थान आणि तामिळनाडू या भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच कर्नाटक, केरळ आणि दक्षिण मध्य प्रदेशातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात हाहाकार
खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरु असताना झालेल्या पावसामुळं कोकण, पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात नुकसान झाले आहे. सोयाबीन, भात, कापूस, ऊस, हळद, तूर आदी पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनानं आणि पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (Maharashtra weather update 19 October Light rain would like to occur over isolated places imd)
Light to moderate rain (occasionally one or two intense spells) likely over Telangana, Coastal Andhra Pradesh and Saurashtra & Kutch and light to moderate rain over West MP, Madhya Mahrashtra and Marathwada during next 3-4 hrs.
Images: Vishakhapatnam Radar & CTBT satellite image pic.twitter.com/Ltnpo7TmXM— India Met. Dept. (@Indiametdept) October 18, 2020
अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकाची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर असताना अतिवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे.
तेलंगाना-हैदराबादमध्ये परिस्थिती गंभीर
तेलंगाना आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये रविवारी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हैदराबादमध्ये. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी शिरलं. तर कर्नाटकमध्येही काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं. या अस्मानी संकटामुळे तब्बल 50 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
इतर बातम्या –
(Maharashtra weather update 19 October Light rain would like to occur over isolated places imd)