Mahira khan On Bollywood: ‘रईस’ सिनेमातून अभिनेता शाहरुख खानसोबत झळकलेली अभिनेत्री माहिरा खान (mahira khan) कायम तिच्या अभिनयामुळे आणि बेधड वक्तव्यामुळे ओळखली जाते. पाकिस्तानी अभिनेत्री असली तरी, भारतात देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. माहिरा सध्या ‘मौला जट’ (Maula Jatt) सिनेमाच्या यशामुळे प्रसिद्धी झोतात आहे. दरम्यान अभिनेत्रीने पाकिस्तानी कलाकारांना भारतात बॅन केल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. ‘मंत्र्यांसाठी कलाकार बळीचा बकरा झाले आहेत…’ असं वादग्रस्त वक्तव्य माहिराने केलं आहे.
‘उरी हल्ल्यां’नंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावामुळे पाकिस्तानी अभिनेत्यांना आणि गायकांना भारतातून बॅन करण्याची मागणी करण्यात आली. म्हणून २०१७ मध्ये बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या आणि शाहरुख खानसोबत ‘रईस’ सिनेमात काम करणाऱ्या माहिराला बॅन करण्यात आलं. त्यानंतर माहिलारा बॉलिवूडमध्ये काम मिळालेलं नाही.
आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये बॉलिवूड कलाकारांना भेटत असलेल्या माहिराने एका मुलाखतीत संताप व्यक्त केला आहे. ‘जेव्हा मी भारतात काम करत होती, ती वेळ माझ्यासाठी सर्वात अद्भुत होती. आता देखील मी अनेकांच्या संपर्कात आहे. भारतात मला प्रचंड प्रेम मिळालं. पण भारत किंवा पाकिस्तानमध्ये असलो तरी आमचं दुर्भाग्य असं आहे की, आम्ही ‘सॉफ्ट टार्गेट’ आहोत.’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘याठिकाणी राजकारण आहे. ही एक वैयक्तिक समस्या नाही. दोन्हीकडून जर कोणी ‘बळीचा बकरा’ असेल तर ते कलाकार आहेत. असं मानू की, कोणी सत्तेत असेल आणि आम्हाला सॉफ्ट टार्गेत करत नसेल, तर प्रचंड चांगलं होईल. तुम्ही दोन्ही देशांमध्ये कलेबद्दल एकत्र काम करण्याचा विचार केला, तर तो उत्तम असेल.’असं देखील अभिनेत्री म्हणाली.