सोलापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण दुर्घटना घडली आहे. तेलंगणा परिवहन महामंडळाची बस ट्रकवर आदळल्याने बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 13 प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी तिघांचा प्रकृती गंभीर आहे. असलम मेहबूब सय्यद, अजमेर रामय्या विको आणि रामय्या बोपेदी अशी जखमींची नावं आहेत.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी चार वाजण्याच्या सुमारास तावडेश्वर गावाजवळ ही दुर्घटना घडली.
जखमी प्रवाशांवर पुणे सोलापूर महामार्गानजीक असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
बसमधील सर्व प्रवासी हैदराबाद येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळते आहे.
सोलापुरात भीषण दुर्घटना, बस जळून खाक, 13 प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर https://t.co/9Scz8c1377 pic.twitter.com/S8EXCEBpCi
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 7, 2019