मुंबई : महाराष्ट्रातील जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांत (Makar sankrant)मकरसंक्रांतीच्या आधीचा दिवस ‘भोगी’ (Bhogi) म्हणून साजरा करतात. ‘न खाई भोगी तो सदा रोगी’हे वाक्य तुम्ही ऐकलेच असेल. तामिळनाडूत हा सण ‘भोंगीपोंगल’ म्हणून साजरा करतात. तर आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून साजरा करतात. तर पंजाबमध्ये ‘लोहिरी’ (Lohri) ,राजस्थानमध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या-वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते. पण याचा नक्की अर्थ काय, ती का साजरी केली जाते? चला तर मग जाणून घेऊयात भोगीचे महत्त्व.
मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात. या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात. माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करण्यात येतात. या दिवशी भोगीची भाजी सुद्धा तयार केली जाते. मराठवाड्यात या भाजीला ‘खेंगट’ म्हणतात.
साहीत्य-चिमूटभर हिंग, चार वांगी चिरलेली, पाव वाटी सोललेला हिरवा वाटाणा, पाव वाटी कापलेले गाजर, पाव वाटी सोललेले हिरवे हरभरे, पाव वाटी भिजवलेले कच्चे शेंगदाणे, पाव वाटी तेल, २ बारीक चिरलेले कांदे, दोन चमचे गरम मसाला, पाव वाटी खिसलेले खोबरं, चवीपुरते मीठ, चार चमचे तीळ, चवीपुरता गूळ
कृती : सर्वप्रथम एका पातेल्यात तेल तापवा. तेल तापले की त्यात कांदा लालसर परतून घ्या. नंतर हिंग, हळद घाला. चिरलेल्या भाज्या तेलात परतून घ्या. नंतर त्यात तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरं घालून मिश्रण एकजीव करा. गूळ घाला. प्रमाणात पाणी घालून शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घालून सजवा. भोगीची ही भाजी ,बाजरीची भाकरी असा नैवेद्य घरोघरी केला जातो.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधीत बातम्या :
Lohri 2022 | लोहरी सण कधी आहे? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि आख्यायिका