हैदराबाद : देशातील विविध राज्यांच्या निवडणुकींचा पारा चढलेला असताना आता हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीचीही चुरस वाढली आहे. यावेळी या निवडणुकीत भाजपने ताकद लावल्याने एमआयएमच्या हातातील ही पालिका कुणाकडे जाणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला खुलं आव्हान दिलं आहे. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अगदी पंतप्रधान मोदींनाही आणा, तुमच्या किती जागा निवडून येतात ते पाहूच, असं म्हणत ओवेसी यांनी भाजपसमोर दंड थोपटले आहेत (MIM Chief Asaduddin Owaisi challenge BJP and PM Modi amid Hyderabad Corporation Election).
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “तुम्ही हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी देखील नरेंद्र मोदींना बोलवा. हव्या तेवढ्या सभा घ्यायला सांगा, आम्हीही पाहतो तुमच्या किती जागा निवडून येतात? भाजप महानगरपालिका निवडणुकीसाठी मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचारसभा घेऊन मतांचं ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न करत आहे.”
BJP cannot campaign on anything but lies. They know they cannot tell Hyderabadis that Modi has given ZERO rupees to victims of floods. They know how badly they’re going to lose in #GHMCElections & so they want to create tensions & mistrust between Hyderabadis https://t.co/6i1ucsNuz3
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) November 26, 2020
“हैदराबादमधील निवडणुकीत भाजप विकासावर बोलणार नाही. हैदराबाद एक विकसित शहर असून येथे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं आहेत. भाजपला हैदराबादची हीच ओळख नष्ट करायची आहे. त्यांना हैदराबादची बदनामी करायची आहे,” असाही आरोप ओवेसींनी भाजपवर केलाय. दरम्यान, भाजपने यावेळीच्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत हैदराबादमध्ये रोहिंग्या मुस्लीम आणि पाकिस्तानी नागरिकांची घुसखोरी होत असल्याचा मुद्दा आणला आहे.
भाजपने हैदराबादमधील घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचंही विधान केलंय. भाजपचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांनी असदुद्दीन ओवेसी यांची तुलना थेट पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांच्याशी केली आहे. ओवेसी हे आधुनिक जिना असल्याचा जहरी आरोप सूर्या यांनी केलाय. तसेच ओवेसी जुन्या हैदराबादमधील हजारो रोहिंग्यांचं संरक्षण करत आहेत, असाही आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी केलाय.
संबंधित बातम्या :
मतदार यादीत 30 हजार रोहिग्यांची नोंद होईपर्यंत अमित शाहांनी झोपा काढल्या काय? : ओवेसी
‘हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करा’, ओवेसींचं पंतप्रधान मोदींना आव्हान
MIM Chief Asaduddin Owaisi challenge BJP and PM Modi amid Hyderabad Corporation Election