पुढील 3 वर्षात मुंबईत नेमके कोणते बदल होणार? एकनाथ शिंदेंनी मांडला राज्याच्या विकासाचा आलेख

पुढील 3 वर्षात मुंबईत नेमके कोणते बदल होणार? एकनाथ शिंदेंनी मांडला राज्याच्या विकासाचा आलेख

| Updated on: Feb 22, 2022 | 1:02 PM

राज्यातील रस्ते कसे अधिकाधिक चांगले करताय येतील याकडे सरकारचे लक्ष असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

मुंबई : भविष्यात महाराष्ट्रातील (Maharashtraपायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल? राज्यात पायाभूत सुविधा अधिक करण्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घेण्यासाठी राज्यातील आघाडीची न्यूज वाहिनी ‘टीव्ही9 मराठी’ने (‘TV9 Marathi’) महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हचे आयोजन केले आहे. महा कॉन्क्लेव्हचं उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हसते पार पडलं यावेळी त्यांनी संबोंधित करताना राज्यात महाविकास आघाडीच्या काळात कोण कोणती विकास कामे झाली. ही विकास कामे करत असताना सरकारपुढे काय आव्हाने होती. सध्या राज्यात कोणती विकास कामे चालू आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा अधिक वाढवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे या सविस्तर माहिती दिली. रस्ते आणि पायाभूत सुविधांचा विकास यावरच कोणत्याही देशाचे भवितव्य ठरत असते, हेच लक्षात घेऊन राज्यातील रस्ते कसे अधिकाधिक चांगले करताय येतील याकडे सरकारचे लक्ष असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

Published on: Feb 22, 2022 01:02 PM