पुणे : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली (MPSC Competitive Exam Postpone) आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. नुकतंच याबाबतचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
नोवेल कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरु (MPSC Competitive Exam Postpone) झालेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने 26 एप्रिल ते 10 मे रोजी नियोजित अनुक्रमे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट – ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या दोन्ही परीक्षा आयोजनासंदर्भात सुधारित तारखा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येतील. या परीक्षाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत फोन नंबरवर कळवण्यात येईल.
तसेच उमेदवारांनी वेळोवेळी वेबसाईटवर भेट द्यावी असेही आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलं आहे.
दरम्यान राज्यात दर दिवशी जवळपास 20 ते 25 रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई आणि पुणे या शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 891 वर पोहोचली आहे. यात मुंबईत 526 तर पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 145 वर पोहोचली आहे. यापाठोपाठ अहमदनगर आणि सांगलीत प्रत्येकी 26 जणांना कोरोनाची लागण झाली (MPSC Competitive Exam Postpone) आहे.