PSL 2023 : सध्या क्रिकेट विश्वात पाकिस्तान सुपर लीगची चर्चा आहे. या लीगमध्ये धावांचा पाऊस पडतोय. शनिवारी एका मॅचमध्ये धावा झाल्या, तशा विकेटही पडल्या. या मॅचमध्ये धावांचा इतका पाऊस पडला की, T20 क्रिकेटमध्ये एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित झाला. 21 वर्षांचा एक मुलगा PSL-8 मध्ये लीडिंग विकेटटेकर बनलाय. आम्ही बोलतोय, अब्बास आफ्रिदीबद्दल. ज्या मॅचमध्ये 515 धावा बनल्या, त्याच सामन्यात त्याने PSL-8 मधील पहिली हॅट्ट्रिक घेतली.
मुल्तान सुल्तांस आणि क्वेटा ग्लॅडिएटर्समध्ये सामना होता. मुल्तान सुल्तांसने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 3 विकेट गमावून 262 धावांचा डोंगर उभारला. PSL च्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
आफ्रिदीची हॅट्ट्रिक
या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या क्वेटा ग्लॅडिएटर्सने पूर्ण जोर लावला. मुल्तान सुल्तांसचा गोलंदाज अब्बास आफ्रिदीने आधी हॅट्ट्रिक घेतली. त्यानंतर आपल्या पंचने कमजोर केलं. क्वेटाच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 253 धावा केल्या.
विजयात दोघांच महत्त्वाच योगदान
मुल्तान सुल्तांसने या मॅचमध्ये 9 धावांनी विजय मिळवला. मुल्तान सुल्तांसच्या विजयात उस्मान खान आणि अब्बास आफ्रिदीने महत्त्वाची भूमिका बजावली. उस्मान खानने PSL च्या इतिहासातील वेगवान शतक ठोकलं. अब्बास आफ्रिदीने हॅट्ट्रिकसह पाच विकेट घेतल्या.
? ???????? ??? ?????? ?
FIRST hattrick of the #HBLPSL8
Abbas Afridi on a ROLL ??#SabSitarayHumaray | #QGvMS pic.twitter.com/sM3KCdQUMG
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 11, 2023
आफ्रिदीने 2 ओव्हरमध्ये घेतली हॅट्ट्रिक
अब्बास आफ्रिदीने पावर प्लेच्या अखेरच्या ओव्हरमध्ये पहिला विकेट घेतला. त्यानंतर 15 व्या ओव्हरमध्ये दुसरा विकेट घेतला. 17 व्या आणि 19 व्या ओव्हरमध्ये त्याने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. 17 व्या ओव्हरच्या अखरेच्या दोन चेंडूंवर त्याने दोन विकेट काढले. त्यानंतर 19 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट काढून आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली.