नाशिक : महाराष्ट्रात कोरोना विषाणूंच्या प्रादूर्भावासोबतच सर्वसामान्यांमध्ये कोरोनाबाबतची भीतीदेखील वाढत चालली आहे (Nashik youth commits suicide). याच भीतीतून नाशिकमध्ये एका 31 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. या तरुणाचं नाव प्रतीक कुमावत असं आहे. तो नाशिकरोड येथील चेहडी पंम्पिंग स्टेशनजवळ वास्तव्यास होता. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईडनोट लिहून ठेवली होती. त्यात त्याने कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त करत आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे (Nashik youth commits suicide).
प्रतीक कुमावतला गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकलाने ग्रासलं होतं. त्यामुळे त्याने आपल्या परिसरातील डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली. मात्र, तरीही काही फरक पडत नव्हता. त्यामुळे त्याला डॉक्टरांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या सल्ल्यानंतर आपल्याला कोरोनाची लागण झाली तर नसेल, या विचाराने तो नैराश्यात गेला. या भीतीमुळे त्याने गळपास घेऊन स्वत:ला संपवलं.
प्रतीकच्या आत्महत्येची माहिती उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली. नाशिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच
राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला (Maharashtra Corona Positive Patient) आहे. आज (11 मार्च) राज्यात 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात पुणे, औरंगाबाद, ठाणे, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे.
पुण्यात रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या दाम्पत्याला (Maharashtra Corona Positive Patient) कोरोनाची लागण झाली आहे. या दाम्पत्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर दुसरीकडे पुण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुण्यात तीन नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
तर औरंगाबादमध्ये आणखी दोघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेमधील कोरोना रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे.
राज्यातील रुग्णांची अपडेट आकडेवारी
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 1008 | 30 | 64 |
पुणे (शहर+ग्रामीण) | 229 | 19 | 25 |
पिंपरी चिंचवड | 22 | ||
ठाणे (शहर+ग्रामीण) | 34 | 3 | |
कल्याण | 34 | 2 | |
नवी मुंबई | 32 | 3 | 2 |
मीरा भाईंदर | 21 | 1 | |
वसई विरार | 12 | 1 | 3 |
पनवेल | 6 | 1 | 1 |
पालघर | 3 | 1 | |
सातारा | 6 | 1 | |
सांगली | 26 | 4 | |
नागपूर | 27 | 5 | 1 |
अहमदनगर (शहर+ग्रामीण) | 25 | 3 | |
बुलडाणा | 13 | 1 | 1 |
औरंगाबाद | 19 | 5 | 1 |
लातूर | 8 | ||
अकोला | 12 | ||
मालेगाव | 5 | 1 | |
रत्नागिरी | 5 | 1 | |
यवतमाळ | 4 | 3 | |
उस्मानाबाद | 4 | 1 | |
अमरावती | 4 | 1 | |
कोल्हापूर | 6 | ||
उल्हासनगर | 1 | ||
नाशिक (शहर +ग्रामीण) | 2 | ||
जळगाव | 2 | 1 | |
जालना | 1 | ||
हिंगोली | 1 | ||
वाशिम | 1 | ||
गोंदिया | 1 | ||
सिंधुदुर्ग | 1 | ||
बीड | 1 | ||
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 9 | ||
एकूण | 1574 | 188 | 110 |