‘कामगार मंत्री आणि आमदार, खासदारांची कामं वेगळी’, कामगारांच्या तक्रारीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 08, 2020 | 8:01 AM

पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी आणि खेड सेझमधील स्थानिक कामगारांना कामावरुन कमी केले जात असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे कामगारांनी अमोल कोल्हेंच्या जनता दराबारात आपलं गऱ्हाणे मांडलं (NCP MP Amol Kolhe).

कामगार मंत्री आणि आमदार, खासदारांची कामं वेगळी, कामगारांच्या तक्रारीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
Follow us on

पुणे : “राज्याचा कामगार मंत्री आणि आमदार, खासदारांची कामं वेगळी आहेत. कामगारांबाबत कामगार मंत्र्यांना नर्णय घेण्याचा आधिकार आहे. त्यामुळे कामगारांच्या विषयाचा फक्त पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करु शकतो”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले (NCP MP Amol Kolhe).

पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी आणि खेड सेझमधील स्थानिक कामगारांना कामावरुन कमी केले जात असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे कामगारांनी अमोल कोल्हेंच्या जनता दराबारात आपलं गऱ्हाणे मांडलं (NCP MP Amol Kolhe). मात्र, अमोल कोल्हेंकडून आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांना कामगारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

चाकण एमआयडीसी आणि खेड सेझमधील स्थानिक कामगार गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. त्यांना कामावर घेण्यास कंपनी प्रशासन तयार नाही. हे सर्व कामगार शेतकऱ्यांची मुलं आहेत. हातात काम नाही, दुसरीकडे शेतीसाठी पाण्याचा प्रश्न आणि शेतात पीक पिकवलं तर बाजारभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या या मुलांवर आज उपासमारीची वेळ आली आहे, असं मत कामगारांकडून मांडलं जात आहे.

आपल्याला न्याय मिळेल या आशेने कामगार अमोल कोल्हे यांच्या जनता दरबारात गेले होते. “साहेब तुमच्या एका फोनने आम्हाला आमचा कामाचा हक्क मिळेल”, असं कामगार अमोल कोल्हेंना म्हणाले. मात्र, त्यावेळी अमोल कोल्हेंनी न्याय देण्याऐवजी कागदी घोडे नाचवत आदेशाची मागणी करत कामगारांच्या विषयाला बगल दिला, असा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे.

आणखी वाचा : नवी मुंबईत आता त्यांची ताकद राहिली नाही, रोहित पवारांचा गणेश नाईकांना टोला