पिंपरी- सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अश्यातच सैन्यात भरती करतो, असं सांगून शालेय कागदपत्रे ताब्यात घेत आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथल्या संभाजी वीरकर यांनी या संदर्भात 9 नोव्हेंबरला पोलिसात तक्रार दाखल केली होती.
सैन्यात नोकरीचे दिले आमिष
फिर्यादी संभाजी वीरकर यांना आरोपी प्रवीण पाटील या व्यक्तीने त्यांचा मुलगा रोहित वीरकर याला सैन्यात नोकरी लावतो असं सांगत त्याची 10 वी, 12वी तसंच इतर मूळ कागदपत्रे मागून घेतली. मात्र त्यानंतर त्यांनी वीरकर यांना नोकरी संदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. तसेच मूळ कागदपत्रेही परत केली नाहीत. त्यानंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रविण पाटील यांच्यासह आणखी दोन जणांना अटक केली आहे.
चार आरोपींना अटक
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत निगडी पोलिसांनी ज्या चार आरोपींना अटक केलीय ते सैन्य भरती घोटाळ्यात सहभागी नसल्याचे उघड झालंय.या प्रकरणी प्रवीण पाटील, महेश वैद्य, अनिल चव्हाणके आणि तुषार उर्फ तुषाल डुकरे या चौघांना अटक करण्यात आलीय.यातील पाटील हा सैन्य किंवा पोलिस भरती मध्ये करतो असे सांगून आरोपी महेश वैद्य याच्या मार्फत उमेदवाराची कागदपत्रे हस्तगत करत होता.तर आरोपी असलेला अनिल चव्हाणके भरती मध्ये वैद्यकीय चाचणी मध्ये मदत करतो असे सांगत होता. तर आरोपी तुषार उर्फ तुषाल डुकरे हा रहिवाशी दाखला देतो असं सांगत असे.सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथल्या संभाजी वीरकर यांनी या संदर्भात 9 तारखेला तक्रार दाखल केली होती. प्रवीण पाटील या व्यक्तीने त्यांचा मुलगा रोहित वीरकर याला सैन्यात नोकरी लावतो असं सांगत त्याची 10 वि 12 वि तसंच इतर मूळ कागदपत्रे आणखी एका व्यक्तीच्या साहाय्याने ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. निगडी पोलिसांनी या प्रकरणी प्रविण पाटील याच्या सह या तीन आरोपीना अटक केलीय.पण या कोणी ही पेपर लिक केले. पेपर लिक चा फायदा घेऊन बनावट कागदपत्रे बनवत फसवण्याचा प्रकार केल्याचे आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्पष्ट केलंय. त्याच बरोबर जो ऑडिओ आणि व्हिडिओ व्हायरल झालाय तो लष्कराकडून लिक झाल्याचा गंभीर आरोप केलाय.या मध्ये लष्कराचा सहभाग असल्याने काही ही माहिती आम्ही बाहेर पडून दिली नाही असं ते म्हणाले तर पेपर फुटी बद्दल देण्यात आलेल्या बातम्या निरर्थक असल्याचं स्पष्टीकरण पोलीस आयुक्त यांच्याकडून देण्यात आलंय.
Akola ST Strike | ‘परबसाहेब भरोसा नाय काय’, अकोल्यात भजन करत एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन
ठरले पण घडलेच नाही..! प्रकल्पातील पाण्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षाच, बदलत्या वातावरणामुळे चिंतेच ‘ढग’