पळपुटा निरव मोदी लूक बदलून लंडनमध्ये!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

( Nirav Modi london) लंडन: पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबीचं ( PNB scam ) हजारो कोटींचं कर्ज बुडवून, परदेशात फरार झालेला डायमंड किंग निरव मोदी (Nirav Modi) लंडनमध्ये खुलेआम फिरताना आढळला. जवळपास 13 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी निरव मोदी लंडनमध्ये लूक बदलून राहात आहे. इंग्रजी वृत्तपत्र द टेलिग्राफने याबाबतचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. टेलिग्राफने आपल्या […]

पळपुटा निरव मोदी लूक बदलून लंडनमध्ये!
युके हायकोर्टाकडून नीरव मोदीला मोठा झटका
Follow us on

( Nirav Modi london) लंडन: पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबीचं ( PNB scam ) हजारो कोटींचं कर्ज बुडवून, परदेशात फरार झालेला डायमंड किंग निरव मोदी (Nirav Modi) लंडनमध्ये खुलेआम फिरताना आढळला. जवळपास 13 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी निरव मोदी लंडनमध्ये लूक बदलून राहात आहे. इंग्रजी वृत्तपत्र द टेलिग्राफने याबाबतचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. टेलिग्राफने आपल्या वृत्तात निरव मोदी लंडनमधील वेस्ट एंडमध्ये जवळपास 100 कोटीच्या अपार्टमेंटमध्ये राहतो.

या वृत्तपत्राच्या पत्रकाराने निरव मोदीला लंडनच्या गजबजलेल्या रस्त्यावर खुलेआम फिरताना पाहिलं. निरव मोदीला यावेळी पीएनबी घोटाळ्याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यावर निरव मोदीने बोलण्यास नकार दिला.

गेल्यावर्षी पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर निरव मोदी भारतातून पसार झाला आहे.

टेलिग्राफच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, निरव मोदी अजूनही हिरे व्यापार करतो. सध्या नव्या अपार्टमेंटजवळच्या सोहोमध्ये एका कार्यालयातून हा व्यवसाय चालवतो. निरव मोदीला फरार घोषित केल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी निरव मोदीचे व्यावसायिक आणि खासगी बँक खाती गोठवली आहेत.

निरव मोदीचा नवा लूक

निरव मोदीशी त्याच्याच ऑफिसजवळ भररस्त्यात संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यावेळी निरव मोदी नव्या लूकमध्ये पाहायला मिळाला. निरव मोदीने सध्या मिशा वाढवल्या आहेत. प्रश्न विचारल्यानंतर निरव मोदीने ‘नो कमेंट्स’ म्हणत उत्तर देणंच टाळलं.

अलिबागमधील बंगला डायनामाईटने पाडला

दरम्यान पळपुटा हिरा व्यापारी निरव मोदीचा रायगडमधील अलिबाग इथला अलिशान बंगला काल पाडण्यात आला. सीआरझेड कायद्याचं उल्लंघन केल्याने त्याच्या बंगल्यावर हातोडा मारण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचा बंगला पाडण्याचा प्रयत्न सुरु होता. पण तो तुटत नव्हता. अखेर काल नियंत्रित स्फोटकांनी डायनामाईट लावून त्याचा बंगला पाडण्यात आला.

अलिबागमधील किहिम बीचजवळ 33 हजार स्क्वेअर फुट असा अलिशान हा बंगला होता. या बंगल्यात जवळपास 100 पेक्षा जास्त डायनामाईट लावून सकाळी 11.15 च्या सुमारास तो पाडण्यात आला.

हा अलिशान बंगला 2009-2010 मध्ये बनवण्यात आला होता. या भल्यामोठ्या बंगल्यात अनेक खोल्या होत्या. पार्ट्यासांठी या बंगल्याचा वापर होत असे.