घराकडे जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना अन्न-पाणी द्या, गडकरींचे टोलचालकांना निर्देश

| Updated on: Mar 28, 2020 | 4:01 PM

देशभरात लोकडाऊनच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत होणाऱ्या मजूरांना टोल चालकांनी आणि महामार्ग प्रशासनाने अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत (Nitin Gadkari on NHAI Toll owner to help migrant).

घराकडे जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना अन्न-पाणी द्या, गडकरींचे टोलचालकांना निर्देश
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात लोकडाऊनच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत होणाऱ्या मजुरांना टोल चालकांनी आणि महामार्ग प्रशासनाने अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत (Nitin Gadkari on NHAI Toll owner to help migrant). या अटीतटीच्या काळात आपण आपल्या देशावसीयांप्रती अधिक दयाळू झालं पाहिजे. टोल चालक नक्की तसं करतील, असाही विश्वास यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. त्या ट्विट करत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

नितीन गडकरी म्हणाले, “अनेक मजूर आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि महामार्ग टोलचालक यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना या स्थलांतरीत होत असलेल्या मजुरांना अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक गोष्टी देण्यास सांगितलं आहे. या अटीतटीच्या काळात आपण आपल्या देशावसीयांप्रती अधिक दयाळू झालं पाहिजे. टोल चालक नक्की तसं करतील असा मला विश्वास आहे.”


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला रात्री 8 वाजता अचानक देशभरात लॉकडाऊन केल्याची घोषणा केली. तसेच यामुळे कुणालही कोठेही जात येणार नाही, घराबाहेर पडता येणार नाही, असं सांगितलं. त्यानंतर देशभरातील विविध शहरांमध्ये राहणाऱ्या मजूरांमध्ये या बातमीने एकच खळबळ माजली. हातावर पोट भरणाऱ्या या मजूरांचं कामही अचानक बंद झालं आणि राहण्याचीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे या मजूरांनी आपआपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, संचारबंदी असल्याने या मजूरांना अनेक ठिकाणी रोखण्यात आलं. परत मागे पाठवण्यात आलं. यात होणारी मजूरांची ससेहोलपट लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याकडे एका एका राज्याची जबाबदारी देऊन तेथील कोरोना नियंत्रणाच्या कामावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. या अंतर्गत नितीन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्याकडून या सर्व घटनांची दखल घेत उपाययोजनांचा प्रयत्न केला जात आहे.

संबंधित बातम्या :

रेल्वे डब्यांचं रुग्णालयात रुपांतर करा, कोरोना सज्जतेसाठी मुंबईकराचं मोदींना पत्र

‘आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट शोधलं, नंतर बाळाला जन्म’, कर्तव्यदक्ष डॉक्टरांना जितेंद्र आव्हाडांचा सलाम

Corona Live | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

निवृत्त डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पाचारण, औरंगाबादेत 50 डॉक्टर्ससह 527 पदांची मेगाभरती

Nitin Gadkari on NHAI Toll owner to help migrant