मुंबई : अभिनेत्री काजोल देवगण हिने नुकतेच तिचे पवई स्थित अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिरानंदानी गार्डनच्या अटलांटिस प्रोजेक्टच्या 21व्या मजल्यावर बांधलेल्या या अपार्टमेंटसाठी भाडेकरू अभिनेत्रीला दरमहा 90 हजार रुपये इतके भाडे देणार आहेत. 771 स्क्वेअर फुटांच्या या अपार्टमेंटसाठी भाडेकरूने 3 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट दिल्याचा दावाही अहवालात केला जात आहे.
काजोलशिवाय अमिताभ बच्चन ते करण जोहरपर्यंत अनेक सेलिब्रिटी घर भाड्याने घेऊन लाखो रुपयांपर्यंत कमावतात. जाणून घेऊया कोणत्या अभिनेत्याला किती भाडे मिळते…
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच अभिनेत्री क्रिती सेननला त्यांचे डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. दोन वर्षांच्या करारावर घेतलेल्या या अपार्टमेंटसाठी अभिनेत्री अमिताभ बच्चन यांना दरमहा 10 लाख रुपये भाडे देणार आहे. लोखंडवाला रोडवरील अटलांटिस बिल्डिंगच्या 27व्या आणि 28व्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटसाठी क्रितीने सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 60 लाख रुपये देऊ केले आहेत.
अमिताभ बच्चन यांचा मुलगाही रिअल इस्टेटमधून दरवर्षी 2 कोटी 26 लाख रुपये कमावतो. वृत्तानुसार, अभिनेता अभिषेक बच्चनने जुहू येथील ‘वात्सा अँड अमू’ बंगल्याचा तळमजला भाड्याने दिला आहे. भाडेकरूने हे घर 15 वर्षांच्या भाडे करारावर घेतले आहे. या घरासाठी ते दरमहा 18.9 लाख रुपये भाडे मोजतात.
सलमान खाननेही त्याची दोन घरे भाड्याने दिली आहेत. वृत्तानुसार, बॉलिवूडच्या भाईजानने वांद्रे येथील आपला अपार्टमेंट तीन महिन्यांसाठी 8.25 लाख रुपये प्रति महिना भाड्याने दिला आहे. त्याचवेळी वांद्रे पश्चिम येथील शिवस्थान हाइट्समध्ये असलेल्या फ्लॅटसाठी तो महिन्याकाठी 95 हजार रुपये भाडं आकारतो.
सैफ अली खानने त्याचे वांद्रेस्थित अपार्टमेंट गिल्ट असोसिएशन मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला 3.5 लाख रुपये मासिक भाड्यावर दिले आहे. वांद्रे येथील या 1500 चौरस फुटांच्या अपार्टमेंटसाठी अभिनेत्याने 15 लाख रुपयांची सुरक्षा ठेव अर्थात सिक्युरिटी डिपॉझिट घेतले आहे.
चित्रपट निर्माता करण जोहरने अलीकडेच त्याच्या दोन व्यावसायिक मालमत्ता अनुक्रमे 17.56 लाख आणि 6.15 लाख रुपयांना भाडेतत्वावर दिल्या आहेत. म्हणजेच करणला रिअल इस्टेटमधून दरवर्षी सुमारे 2 कोटी 84 लाख रुपये मिळतात.
Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?
Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!