Orange Cap Holder List IPL 2022: पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) काल आयपीएल 2022 (IPL 2022) मधला 38 वा सामना खेळला गेला. या मॅच नंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अनेक बदल दिसून आले आहेत. जोस बटलर अजूनही पहिल्या स्थानावर आहे. पण टॉप 5 मध्ये आणखी एका खेळाडूची एंट्री झाली आहे. पंजाब किंग्सचा सलामीवीर शिखर धवनने काल तुफान बॅटिंग केली. धवनचा हा आयपीएलमधला 200 वा सामना होता. त्याने हा सामना आपल्या फलंदाजीने खऱ्या अर्थाने संस्मरणीय बनवला. त्याने या सामन्यात अनेक रेकॉर्ड्स बनवले. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत जोरदार एंट्री मारली आहे. शिखर धवनने काल 58 चेंडूत नाबाद 88 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत 9 चौकार आणि दोन षटकार होते. शिखरने धीमी सुरुवात केली. पण नंतर त्याच्या खेळीने वेग पकडला. त्याने चौफेर फटकेबाजी करुन धावा वसूल केल्या.
शिखर धवनने काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात 6 हजार धावांचा टप्पाही पार केला. विराट कोहलीनंतर अशी कामिगरी करणारा आयपीएलमधला तो दुसरा फलंदाज आहे. आयपीएल 2022 मध्ये शिखरच्या आठ सामन्यात 302 धावा झाल्या आहेत. धवन या सीजनमध्ये 43.14 च्या सरासरीने धावा करतोय. 132.45 त्याचा स्ट्राइक रेट आहे. 302 धावांसह शिखर ऑरेज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे फक्त जोस बटलर आणि केएल राहुल आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप 5 फलंदाज
फलंदाज | सामने | धावा |
---|---|---|
जोस बटलर | 7 | 491 |
केएल राहुल | 8 | 368 |
शिखर धवन | 8 | 302 |
हार्दिक पंड्या | 6 | 295 |
तिलक वर्मा | 8 | 272 |