देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5734 वर, 24 तासात 549 नवे रुग्ण

| Updated on: Apr 09, 2020 | 5:44 PM

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Corona patients in India) आता 5734 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 549 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5734 वर, 24 तासात 549 नवे रुग्ण
Follow us on

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Corona patients in India) आता 5734 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 549 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाने आतापर्यंत 166 जणांचा बळी घेतला आहे. तर 473 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली (Corona patients in India).

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने 2500 डॉक्टर्स आणि 35,000 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तैनात केलं आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी देशभरातील 586 हेल्थ युनिट टीम, 45 उपविभागीय हॉस्पिटल, 56 विभागीय हॉस्पिटल, 8 प्रोडक्शन युनिट हॉस्पिटल आणि 16 क्षेत्रिय हॉस्पिटल पूर्णपणे सज्ज झाले आहेत, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं.

“पीपीई, मास्क आणि व्हेंटिलिटर्सचा पूर्णपणे पुरवठा केला जाणार आहे. पीपीई भारतातच तयार केले जाणार आहेत. आतापर्यंत 1.7 कोटी पीपीईची ऑर्डर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 49,000 व्हेंटिलिटर्सचीदेखील ऑर्डर दिली गेली आहे”, असंदेखील अग्रवाल यांनी सांगितली.

“हरियाणा राज्यात ‘दत्तक कुटुंब अभियाना’अंतर्गत 13000 कुटुंबांना 64 लाखांची मदत केंद्र सरकार करणार आहे”, अशीदेखील माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

“देशात आतापर्यंत 1 लाख 30 हजार जणांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी 5734 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दीड महिन्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत 3 ते 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे”, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या प्रवक्त्यांनी दिली.

संबंधित बातम्या :

Corona : कर्तव्यावर स्वरक्षणासाठी वर्धा पोलिसांची शक्कल, सॅनिटाईझ करणारी पोलीस व्हॅन

इस्लामनुसार प्रार्थना करा, शासकीय नियमानुसार अंत्यविधी करा, बारामतीतील कोरोनाबाधित कुटुंबाचा आदर्श