Ration card | 1 जूनपासून रेशन कार्डबाबत नवे नियम, नेमके बदल काय?

| Updated on: May 30, 2020 | 5:15 PM

देशभरात 1 जूनपासून 'वन नेशन वन रेशन कार्ड' ही योजना लागू होणार आहे (One nation one ration card). त्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी 1 जून पासून काही महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत.

Ration card | 1 जूनपासून रेशन कार्डबाबत नवे नियम, नेमके बदल काय?
Follow us on

मुंबई : देशभरात 1 जूनपासून ‘वन नेशन वन रेशन कार्ड‘ ही योजना लागू होणार आहे (One nation one ration card). त्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी 1 जून पासून काही महत्त्वपूर्ण नियम बदलणार आहेत. या नियमांमुळे रेशन कार्डधारक देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून सरकारने ठरवलेल्या दरात अन्नधान्य विकत घेऊ शकणार आहेत (One nation one ration card).

आतापर्यंत रेशन कार्ड धारक ज्या जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड तयार करत त्याच जिल्ह्यात त्यांना रेशन घेता येत होतं. मात्र, आता सर्व लाभार्थ्यांना देशभरातील कोणत्याही ठिकाणावरुन रेशन घेता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने देशात अशा प्रकारची योजना लागू व्हावी यासाठी केंद्र सरकारला आदेश दिले होते. अखेर ही योजना 1 जून पासून संपूर्ण देशभरात लागू होत आहे.

17 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश योजनेत सहभागी

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेत आतापर्यंत देशातील 17 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले आहेत. तर उदिसा, मिझोराम आणि नागालँड या राज्यांनीदेखील या योजनेत सहभागी होण्यास तयारी दर्शवली आहे.

लाभार्थ्यांना मदत कशी मिळेल?

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत पीडीएस मशीनद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटवली जाईल. पीडीएस मशीनच्या आधारे लाभार्थ्यांना ओळखले जाईल. या योजनेसाठी सरकारला सर्व रेशन दुकानांवर पीडीएस मशीन बसवावी लागेल.

नवं रेशन कार्ड बनवायची आवश्यकता नाही

या योजनेसाठी नवं रेशनकार्ड बनवायची किंवा जुनं रेशन कार्ड जमा करण्याची आवश्यकता नाही. लाभार्थी आपल्या जुन्या रेशन कार्डमार्फतही योजनेचा लाभ घेऊ शकतात. रेशन कार्ड दोन भाषांमध्ये राहतील. पहिली म्हणजे स्थानिक भाषा आणि दुसरी भाषा ही हिंदी किंवा इंग्रजी असेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला 3 रुपये किलोने तांदूळ तर 2 रुपये किलोने गहू मिळतील. दरम्यान, ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही, ते ऑनलाईन अर्ज दाखल करुन रेशन कार्ड मिळवू शकतात.

रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा दाखल करायचा?

  •  सर्वात अगोदर राज्याच्या खाद्य विभागाच्या वेबसाईटवर जावं लागेल
  • तिथे भाषा निवड केल्यानंतर आणखी काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. त्यामध्ये गाव, शहर, जिल्हा, तालुका इतर गोष्टी असतील.
  • त्यानंतर कोणत्या प्रकारचं रेशन कार्ड हवं आहे, ते ठरवावं लागेल
  • त्यानंतर कुंटुंबासंबंधित वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. त्यामध्ये कुटुंबप्रमुख, आधारकार्ड नंबर यांचा समावेश आहे.
  • सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करावं. त्यानंतर त्या माहितीची प्रिंट काढून स्वत:कडे ठेवावी.

हेही वाचा :

मोदी सरकारमुळे मजुरांची उपेक्षा, भाजप नेत्यांनी खोटं बोलणं सोडावं : सचिन सावंत

उद्धव ठाकरे सरकार कुठे कमी पडतंय? देवेंद्र फडणवीस म्हणतात….

मोदी 2.0 सरकारची वर्षपूर्ती, पंतप्रधानांचं जनतेला पत्र