गुड न्यूज | ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी, लसीमुळे दुहेरी संरक्षण

| Updated on: Jul 21, 2020 | 12:22 AM

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीचे दुहेरी फायदे असल्याचं मानवी चाचणीनंतर स्पष्ट झालं आहे (Oxford Corona Vaccine triggers immune response).

गुड न्यूज | ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी, लसीमुळे दुहेरी संरक्षण
Follow us on

लंडन : ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाची कोरोना लसीची सुरुवातीची मानवी चाचणी यशस्वी झाली आहे (Oxford Corona Vaccine triggers immune response). या चाचणीचे निष्कर्ष वैद्यकीय जर्नल ‘द लान्सेट’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. ही लस सुरक्षित आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे, असं ‘द लान्सेट’मध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘द लान्सेट’च्या संपादकांकडून ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या टीमचं कौतुक करण्यात आलं आहे (Oxford Corona Vaccine triggers immune response).

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीचे दुहेरी फायदे असल्याचं मानवी चाचणीनंतर स्पष्ट झालं आहे. या लसीमुळे शरीरात अँटीबॉडींप्रमाणेच टी सेल्सच्या निर्मितीतही वाढ होत असल्याचं उघड झालं आहे. या टी सेल्समुळे विषाणूंनी ग्रासलेल्या दुषित पेशी नष्ट होतात. विशेष म्हणजे शरीरात अँटीबॉडी या फक्त तीन महिने असतात. मात्र, टी सेल्स शरीरात जास्त काळ टिकतात.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने 1 हजार 77 स्वयंसेवकांवर लसीची मानवी चाचणी केली. या चाचणीतून रोगप्रतिकार क्षमता वाढत असल्याचं उघड झालं. याशिवाय कोरोना लसीविरोधात लढणाऱ्या पांढऱ्या पेशींमध्येदेखील कमालीची वाढ झाल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं.

मात्र, अजूनही या लसीच्या मानवी चाचणीचे पुढचे काही टप्पे बाकी आहेत. सर्व टप्प्यांची चाचणी झाल्यानंतरच ही लस बाजारात उपलब्ध होईल. या लसीच्या चाचणीचे सर्व टप्पे सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबर महिन्यात ही लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ब्रिटनने लसीच्या अंतिम टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्याआधीच 10 कोटी लसींची ऑर्डर घेऊन ठेवली आहे. भारतातही या लसीचं उत्पादन होत आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे या लसीच्या उत्पादनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या प्रोफेसर सारा गिल्बर्ट यांनी लसीच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सारा गिल्बर्ट लसीच्या शेवटच्या काही टप्प्यातील चाचणीचंदेखील नेतृत्व करत आहेत. कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी ही लस 80 टक्के परिणामकारक आहे, असा दावा गिल्बर्ट यांनी केला आहे.

“कोणतीही कोरोना लस 100 टक्के परिणामकारक राहू शकत नाही. कारण विषाणूला रोखण्यासाठी न्यूट्रलायजिंग अँडिबॉडी निर्माण करणं शक्यच नाही”, असं सारा गिल्बर्ट म्हणाल्या आहेत.

ऑक्सफोर्ड विद्यापीठ 10 हजार स्वयंसेवकांवर अंतिम चाचणी करणार आहे. लसीच्या टास्कफोर्सचे अध्यक्ष केट बिंघम यांनी ही लस इतर लसींपेक्षा जास्त प्रभावशाली असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, विद्यापीठाचे प्रोफेसर अँड्रिअन हिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लस उत्पादनात 7 उत्पादकांना सहभागी करण्यात आलं आहे. यात 3 ब्रिटन, 2 यूरोप, 1 चीन आणि एक भारतातील उत्पादक आहे. ब्रिटेनची नॅशनल इंस्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च आणि द यूके रिसर्च अँड इनोवेशनने ही लस शोधणाऱ्या गिलबर्ट यांच्या टीमला 2.2 मिलियन पाउंडचं अनुदान दिलं आहे.

हेही पाहा : ऑक्सफोर्डच्या लसीमुळे दुहेरी संरक्षण, लेन्सेटमध्ये चाचणी प्रकाशनाची शक्यता