सोलापूर : सोलापूरनंतर आता पंढरपुरातही कोरोनाने (MLA Bharat Bhalke House For Quarantine) शिरकाव केला असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी जिल्हा न्यायालयाजवळ असलेला त्यांचा दुमजली बंगला क्वारंटाईनसाठी देणार असल्याचं जाहीर केले आहे. तसे पत्र त्यांनी प्रशासनाला दिले आहे. यापूर्वी शिवसेना खासदार धैर्यशील माने (MLA Bharat Bhalke House For Quarantine) यांनीही त्यांचं घर क्वारंटाईनसाठी दिलं होतं.
सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा एका आमदाराने लोकांसाठी आपला राहाता बंगला खाली करुन देण्याचे जाहीर केले आहे. आमदार भालके यांच्या सामाजिक दातृत्वाचे कौतुक केले जात आहे.
पंढरपूर शहराची सुमारे सव्वा लाख लोक संख्या आहे. त्यातच पुणे, मुंबईसह इतर राज्यातून आतापर्यंत सुमारे सहा हजारांहून अधिक लोक शहर आणि तालुक्यात आले आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढू लागली आहे. नगरपालिका प्रशासनाने शहरातील मठ, धर्मशाळा आणि मठामध्ये बाहेरुन आलेल्या लोकांना विलगीकरण केले आहे.
कोरोनाचा वाढता धोका पाहाता, आमदार भारत भालके यांनी आज आपला राहता बंगला लोकांसाठी खाली करुन देणार असल्याचे जाहीर केले. या दुमजली बंगल्यामध्ये जवळपास 100 हून अधिक बेड बसतील. यासाठी लागणारे सर्व साहित्य देखील आपण उपलब्ध करुन देणार आहे. या ठिकाणी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांसाठी देखील सोय केली जाईल, असंही भालके यांनी सांगितलं (MLA Bharat Bhalke House For Quarantine).
स्वत:चं घर क्वारंटाईनसाठी देणारा देशातील पहिला खासदार, धैर्यशील मानेंचा आणखी एक दिलदारपणाhttps://t.co/8XeT7Xm6j9 @mpdhairyasheel @AUThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2020
शिवसेना खासदार धैर्यशील मानेंकडून स्वत:च घर क्वारंटाईनसाठी
यापूर्वी हातकणंगले मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी स्वत:चे घर दिले. हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील बंगला, त्यांनी रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी दिला आहे. कराड येथून रुकडी या गावात परतलेल्या विद्यार्थ्याला होम क्वारंटाईन करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी स्वत:चं घर राहण्यासाठी दिलं होतं.
क्वारंटाईनसाठी स्वत:चं घर देणारे धैर्यशील माने हे देशातील पहिले खासदार आहेत. त्यानंतर आता आमदार भारत भालके यांनीही स्वत:च राहत घर क्वारंटाईनसाठी (MLA Bharat Bhalke House For Quarantine) दिलं आहे.
संबंधित बातम्या :
स्वत:चं घर क्वारंटाईनसाठी देणारा देशातील पहिला खासदार, धैर्यशील मानेंचा आणखी एक दिलदारपणा
काँग्रेस आमदार भारत भालकेंचं ‘जाना था भाजप, पहुँच गये राष्ट्रवादी’