पुणे : यंदाच्या कार्तिकी यात्रेनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. नुकतंच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. (Permission denied for Kartiki Ekadashi Yatra by Collector of Pune)
कार्तिकी शुद्ध एकादशीच्या निमित्त महाराष्ट्रातील जिल्ह्यातून यंदाही पंढरपूर येथे दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा देवस्थानात करायचे नित्योपचार मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन होणार आहे. त्यामुळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यातून दिंड्या पंढरपुरात दाखल होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच त्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कार्तिकी एकादशीनिमित्त देवस्थानात नित्योपचार काही मान्यवरांच्या उपस्थितीत आणि कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे दिंड्या मार्गस्थ होणार नाहीत. याबाबत पोलीस, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
कार्तिकी यात्रेचा कालावधी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहेत. कार्तिकी शुद्ध एकादशी यात्रेनिमित्त राज्यातील विविध जिल्ह्यांतून यावर्षीही दिंड्या पंढरपूर येथे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण कार्तिकी एकादशीनिमित्त देवस्थानात नित्योपचार कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून दिंड्या निघणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केलं आहे.
देशभरात कोविड 19 संसर्ग अजूनही आटोक्यात आला नाही. अशातच कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती आरोग्य संस्थानी व्यक्त केली आहे. २६ नोव्हेंबर ला कार्तिकी एकादशी आहे. आषाढी नंतर भरणारी ही मोठी वारी आहे. मात्र या यात्रेत गर्दी होऊन कोविड 19 संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. (Permission denied for Kartiki Ekadashi Yatra by Collector of Pune)
संबंधित बातम्या :
पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी, दिंड्या आणि पालख्यांना प्रवेश बंदी