कराची: पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या नावाने पाकिस्तानच्या बाजारात चक्क दारूचा नवा ब्रँड आला आहे. ‘गिन्ना’ (Ginnah) नावाच्या या दारूच्या ब्रँडवरून पाकिस्तानात एकच गहजब निर्माण झाला असून सोशल मीडियातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आपल्याच राष्ट्रपुरुषाच्या नावाने आलेल्या या दारूमुळे देशाची अब्रू वेशावर टांगल्याची भावना पाकिस्तानमधील तरुणांमधून व्यक्त होत आहे. (Photos of Alcoholic Drink ‘Ginnah’ Named After Pakistan Founder Go Viral)
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ‘गिन्ना’ नावाने लॉन्च झालेल्या या दारुच्या ब्रँडचा फोटो शेअर केला आहे. एएनआयच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर एकच गहजब निर्माण झाला आहे. यूजर्सनी या ट्विटमध्ये जिनांच्या नावाचा उल्लेख करून थेट मतं व्यक्त केली आहेत. “इस्लाममध्ये ज्या गोष्टींची मनाई होती. त्या सर्व गोष्टी जिनांनी केल्या. पूल बिलियर्ड्स, सिगार, पोर्क सॉसेजच्या सोबतच शानदार स्कॉच, व्हिस्की आणि दारूचंही त्यांनी भरपूर सेवन केलं,” असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एका यूजर्सने जिनांच्या नावाने असलेल्या गिन्ना नावाच्या या दारूच्या बॉटलचा फोटो शेअर केला आहे. ‘इन द मेमोरी ऑफ द मॅन प्लेजर, हू वॉज: गिन्ना,’ असं या बॉटलवर इंग्रजीत लिहिलं आहे. जिना यांच्या स्मरणार्थ ही दारू लॉन्च करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 1947मध्ये धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून निर्माण झालेल्या पाकिस्तानचे मोहम्मद अली जिना संस्थापक होते, असं या बॉटलवर लिहिलं आहे. पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर काही दशकानंतर जनरल मोहम्मद जिया-उल-हक यांनी बंड करून 1977मध्ये तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांना सत्तेवरून हटवलं, असंही या बॉटलवर नमूद करण्यात आलं आहे.
‘In the memory of the man of pleasure’: Alcoholic drink named after Pak founder Jinnah
Read @ANI Story | https://t.co/qiuEs1LYdc pic.twitter.com/sYIgKZlyZc
— ANI Digital (@ani_digital) December 1, 2020
या बॉटलच्या फोटोवर यूजर्सच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गिन्नाला राष्ट्रीय पेय म्हणून घोषित करण्याची गरज आहे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया एका यूजर्सने व्यक्त केली आहे. तर, आपल्या देशाच्या संस्थापकाच्या नावाने दारू लॉन्च केली, याची लाज वाटली पाहिजे, असा संताप दुसऱ्या यूजर्सने व्यक्त केला आहे. तर आता गिन्नाच्या मागे कोण आहे? पीटीएम की पीडीएम? नालायकांनो, उत्तर द्या, आता गिन्नाचा हिशोब द्या, असा संतप्त सवाल दुसऱ्या यूजर्सने व्यक्त केला आहे. (Photos of Alcoholic Drink ‘Ginnah’ Named After Pakistan Founder Go Viral)
Needs to be made the national drink ? #Ginnah https://t.co/asJZpBVGHK
— Elie Gohar Durrani (@khaneliegohar) December 1, 2020
संबंधित बातम्या:
जिनांची भाषा बोलणाऱ्या ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत भारतविरोधी : भाजप खासदार तेजस्वी सूर्या
सावरकरांची संकल्पना मोहम्मद जिनांनी प्रत्यक्षात आणली : भूपेश बघेल
(Photos of Alcoholic Drink ‘Ginnah’ Named After Pakistan Founder Go Viral)