PHOTOS: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन; मुख्यमंत्री ते राज्यपालांकडून अभिवादन
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं.
-
-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा आज (6 डिसेंबर) 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे.
-
-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीचे काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
-
-
दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरात राहून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारसह पालिकेकडून करण्यात आले आहे.
-
-
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आरपीआयचे नेते रामदास आठवले हे देखील चैत्यभूमीवर उपस्थित होते.
-
-
या खास दिनासाठी चैत्यभूमीवर खास तयारी करण्यात आली होती.
-
-
चैत्यभूमी परिसरात गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे. दादरमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.
-
-
तर 14 एप्रिल 2023 ला बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण होईल अशी घोषणा यावेळी धनंजय मुंडे यांनी केली.