पुणे: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या 720 जागा भरल्या जाणार आहेत. कोरोनाकाळात दोन वेळा लेखी परीक्षेचा मुहूर्त चुकला असून आता तिसरा मुहूर्त ठरला आहे. त्यानुसार आता 23 ऑक्टोबरला दुपारी 3 ते 4 या वेळेत ही परीक्षा पार पडेल.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिल्या टप्प्यात उपलब्ध असलेल्या 720 जागांसाठी तब्बल एक लाख 89 हजार 732 अर्ज आले आहेत.
सर्वसाधारण – 176
महिला – 216
खेळाडू – 38
प्रकल्पग्रस्त – 38
भूकंपग्रस्त – 14
माजी सैनिक – 107
अंशकालीन पदवीधर – 71
पोलीस पाल्य – 22
गृहरक्षक दल – 38
पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या शिपाई पदांच्या भरतीसाठी मंगळवारी लेखी परीक्षा पार पडली. अवघ्या 214 जागांसाठी 39,323 जणांनी अर्ज केले होते. मात्र, 79 केंद्रांवर पार पडलेल्या लेखी परीक्षेला यापैकी केवळ 12027 विद्यार्थीच उपस्थित राहिले. राज्यातील पोलीस भरतीप्रक्रिया रखडण्याच्या अनुभवामुळे उमेदवारांमध्ये परीक्षाच न देण्याची उदासीनता दिसून आली का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
तर दोन केंद्रांवर लेखी परीक्षेसाठी डमी उमेदवार बसवल्याच्या घटना उघड झाल्या. याप्रकरणी सिंहगड रोड आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
या भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच शारीरिक चाचणीच्या अगोदर लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी 22 सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र मिळायला सुरुवात झाली होती. आयुक्तालयाची लेखी परिक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबविण्यात आली. आरोग्य विभागाच्या परीक्षांबाबत उडालेल्या गोंधळानंतर ही परीक्षा सुरळीत पार पडणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, परीक्षा सुरळीत पार पडल्याने संबंधित यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 8 आणि 9 सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एकूण 6 हजार 185 पदांसाठी ही भरती परीक्षा होणार होती. त्याऐवजी आता 25 सप्टेंबर गट क आणि 26 सप्टेंबरला गट ड संवर्गाची परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
अनंत चतुर्दशीला पुणे बंद! फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार, अजित पवारांकडून स्पष्ट
पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातवा वेतन आयोग लागू
खडकवासला धरण 100 टक्के भरलं, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, पुणेकर निर्धास्त!